1. 2023-24 सालातला महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प किती कोटी रुपयांचा महसूल तुटीचा आहे?
उत्तर- 16 हजार 122 कोटी रुपये महसुली तुटीचा अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्पीय अंदाज- महसूल जमा- 4,49, 522 कोटी रुपये, महसुली खर्च- 4,65,645 कोटी रुपये.
2.महाराष्ट्र राज्याच्या 2023- 24 अर्थसंकल्पात विभागनिहाय निधी कसा वाटण्यात आला आहे?
उत्तर- (२०२३-१४) विभागावर निधी वाटप- कृषी व संलग्न सेवा १३, १५८ कोटी , ग्रामीण विकास ७, २९५ कोटी, विशेष क्षेत्र विकास ४२५ कोटी, पाटबंधारे व पूरनियंत्रण १६,६९७ कोटी, ऊर्जा १२ ४०५ कोटी , उद्योग व खाण १८५३ कोटी, परिवहन ३१,८२६ कोटी , सामाजिक व सामुहिक सेवा ६७,८५६ कोटी, सामान्य सेवा.१२३८२ कोटी
3. 2020-21 मध्ये महाराष्ट्र राज्यात 15 हजार 225 हेक्टरवर आंबा बागा उभ्या राहिल्या. 2021- 22 मध्ये ही लागवड उच्चांकी म्हणजेच 20 हजार 822 हेक्टरवर नेली. यंदादेखील 2022-23 चालू वर्षात फेब्रुवारी अखेर आंबा लागवडीने19 हजार 100 हेक्टरचा टप्पा ओलांडला आहे.
4. केंद्र सरकारने यंदा 2023- 24 मध्ये देशात १३६ लाख टन हरभरा उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला. मात्र वाढत्या तापमानामुळे उत्पादनात घट येत आहे. ठिकठिकाणी झालेला वादळी पाऊस आणि गारपिटीने हरभरा पिकाला फटका बसला. त्यामुळे उत्पादन यंदा १०० ते १०५ लाख टनांच्या दरम्यान राहू शकते, असा अंदाज आहे. सध्या 'नाफेड'कडे १६ लाख टनांच्या दरम्यान साठा आहे. याचा दबाव बाजारावर आहे. जागतिक हरभरा उत्पादन 2021 मध्ये 170 लाख टन झाले होते.
5. अमेरीकेच्या कृषी विभागाने अर्थात 'यूएसडीए' ने भारताचे कापूस उत्पादन 313 लाख गाठीपर्यंत कमी झाल्याचे स्पष्ट केले. यंदा अमेरिका, भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशमधील कापूस उत्पादन घटले, चीनमध्ये मात्र उत्पादन वाढल्याची नोंद आहे. यूएसडीएच्या मते, भारतात मागील हंगामात 312 लाख गाठी कापूस उत्पादन झाले होते. ते यंदा 313 लाख गाठींवर स्थिरावेल. कापूस निर्यात 19 लाख गाठींनी घटून 28 लाख गाठीपर्यंत कमी होईल.

No comments:
Post a Comment