जगातील सर्वात लहान देश मानला जाणारा व्हॅटिकन सिटी पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे.येथील राजवाडे, बागा, कलात्मक भिंती आणि इमारती पाहुण्यांच्या स्वागतासाठी उत्सुक दिसतात.व्हॅटिकन सिटीची मुख्य ओळख म्हणजे त्याच्या मध्यभागी असलेला सॅन पिएट्रो नावाचा भव्य हॉल. येथे ख्रिश्चन समुदायातील लाखो लोक विशेष प्रसंगी त्यांचे धर्मगुरू पोप यांनी दिलेला उपदेश स्वीकारण्यासाठी जमतात. व्हॅटिकन सिटी’ला स्वतंत्र देश म्हणून मान्यता मिळाली, फेब्रुवारी २०२३ मध्ये ९४ वर्षे पूर्ण झाली. युरोपमधील हा व्हॅटिकन देश टायबर नदीच्या किनारी, व्हॅटिकन पहाडावर वसलेला आहे. रोमन कॅथॉलिक पंथाचे ते प्रमुख केंद्र आहे. त्याला दोन हजार वर्षांचा ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा आहे. विश्वविख्यात कलाकारांनी तिथे भव्यदिव्य वास्तू निर्माण केलेल्या आहेत. त्यात अनेक चर्चेस, कलात्मक प्रासाद, संग्रहालये आणि पुस्तकालये आहेत. अधिकृत भाषा इटालियन आणि लिपी इंग्रजीप्रमाणे रोमन आहे. सन १९३०मध्ये ‘पोप’नी तिथे आपले चलन जारी केले. आर्थिक व्यवहार ‘युरो’मध्ये चालतात. १९३२ साली शहरात रेल्वे स्टेशन निर्माण झाले. ११ फेब्रुवारी १९२९ रोजी व्हॅटिकन इटलीपासून वेगळा होऊन एक स्वतंत्र देश म्हणून ओळखला जाऊ लागला. इसवी सनाच्या आठव्या शतकात रोमच्या भोवताली असलेल्या प्रदेशांनी चर्चच्या शासनाचा स्वीकार केला. त्याला ‘पेपल स्टेट्स’ असे नाव होते. सन १८७०मध्ये इटलीने हे शासन आपल्या ताब्यात घेतले. त्यामुळे चर्च आणि इटलीत तणाव निर्माण झाला. रोमन कॅथॉलिक चर्च आपल्या सर्वोच्च धर्मगुरूला येशू ख्रिस्ताचा प्रतिनिधी मानत असे. कुठल्याही राज्याच्या अधिकाराखाली राहणे त्यांना मान्य नव्हते. म्हणूनच सन १९२९मध्ये दोघांच्यात समझोता होऊन, सेंट पीटर चर्चच्या लगतची १०९ एकर जागा त्यांना देऊन एका नव्या राष्ट्राची निर्मिती करण्यात आली. अशा रीतीने ‘व्हॅटिकन सिटी’ उदयास आली.इटलीची राजधानी रोम येथे वसलेली व्हॅटिकन सिटी जगातील सर्वात लहान देश मानला त्याचे क्षेत्रफळ फक्त 44 हेक्टर आहे आणि लोकसंख्या एक हजारांपेक्षा कमी आहे.शहराचे संरक्षण इटालियन सैन्य नाही तर स्विस सैनिक करत आहेत. येथील प्रचंड मैदानाला सेंट पीटर स्क्वेअर म्हणतात. येथे भव्य कारंजे स्वागत करतात. येथील प्रशस्त सभागृह जगप्रसिद्ध चित्रे आणि उत्कृष्ट संगमरवरी कोरीव कामांनी सुशोभित केलेले आहे. सोन्याचे नक्षीकामही आकर्षक आहे. हे ठिकाण एक चर्च तर आहेच शिवाय सुंदर कला संग्रहालय असल्याचे दिसते.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
Thursday, June 29, 2023
सर्वात लहान देश: व्हॅटिकन सिटी
जगातील सर्वात लहान देश मानला जाणारा व्हॅटिकन सिटी पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे.येथील राजवाडे, बागा, कलात्मक भिंती आणि इमारती पाहुण्यांच्या स्वागतासाठी उत्सुक दिसतात.व्हॅटिकन सिटीची मुख्य ओळख म्हणजे त्याच्या मध्यभागी असलेला सॅन पिएट्रो नावाचा भव्य हॉल. येथे ख्रिश्चन समुदायातील लाखो लोक विशेष प्रसंगी त्यांचे धर्मगुरू पोप यांनी दिलेला उपदेश स्वीकारण्यासाठी जमतात. व्हॅटिकन सिटी’ला स्वतंत्र देश म्हणून मान्यता मिळाली, फेब्रुवारी २०२३ मध्ये ९४ वर्षे पूर्ण झाली. युरोपमधील हा व्हॅटिकन देश टायबर नदीच्या किनारी, व्हॅटिकन पहाडावर वसलेला आहे. रोमन कॅथॉलिक पंथाचे ते प्रमुख केंद्र आहे. त्याला दोन हजार वर्षांचा ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा आहे. विश्वविख्यात कलाकारांनी तिथे भव्यदिव्य वास्तू निर्माण केलेल्या आहेत. त्यात अनेक चर्चेस, कलात्मक प्रासाद, संग्रहालये आणि पुस्तकालये आहेत. अधिकृत भाषा इटालियन आणि लिपी इंग्रजीप्रमाणे रोमन आहे. सन १९३०मध्ये ‘पोप’नी तिथे आपले चलन जारी केले. आर्थिक व्यवहार ‘युरो’मध्ये चालतात. १९३२ साली शहरात रेल्वे स्टेशन निर्माण झाले. ११ फेब्रुवारी १९२९ रोजी व्हॅटिकन इटलीपासून वेगळा होऊन एक स्वतंत्र देश म्हणून ओळखला जाऊ लागला. इसवी सनाच्या आठव्या शतकात रोमच्या भोवताली असलेल्या प्रदेशांनी चर्चच्या शासनाचा स्वीकार केला. त्याला ‘पेपल स्टेट्स’ असे नाव होते. सन १८७०मध्ये इटलीने हे शासन आपल्या ताब्यात घेतले. त्यामुळे चर्च आणि इटलीत तणाव निर्माण झाला. रोमन कॅथॉलिक चर्च आपल्या सर्वोच्च धर्मगुरूला येशू ख्रिस्ताचा प्रतिनिधी मानत असे. कुठल्याही राज्याच्या अधिकाराखाली राहणे त्यांना मान्य नव्हते. म्हणूनच सन १९२९मध्ये दोघांच्यात समझोता होऊन, सेंट पीटर चर्चच्या लगतची १०९ एकर जागा त्यांना देऊन एका नव्या राष्ट्राची निर्मिती करण्यात आली. अशा रीतीने ‘व्हॅटिकन सिटी’ उदयास आली.इटलीची राजधानी रोम येथे वसलेली व्हॅटिकन सिटी जगातील सर्वात लहान देश मानला त्याचे क्षेत्रफळ फक्त 44 हेक्टर आहे आणि लोकसंख्या एक हजारांपेक्षा कमी आहे.शहराचे संरक्षण इटालियन सैन्य नाही तर स्विस सैनिक करत आहेत. येथील प्रचंड मैदानाला सेंट पीटर स्क्वेअर म्हणतात. येथे भव्य कारंजे स्वागत करतात. येथील प्रशस्त सभागृह जगप्रसिद्ध चित्रे आणि उत्कृष्ट संगमरवरी कोरीव कामांनी सुशोभित केलेले आहे. सोन्याचे नक्षीकामही आकर्षक आहे. हे ठिकाण एक चर्च तर आहेच शिवाय सुंदर कला संग्रहालय असल्याचे दिसते.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
Monday, June 26, 2023
(नॉलेज ट्रेवल) टोरोंटो: भव्यता, संस्कृती आणि संग्रहालये पर्यटकांना करतात आकर्षित
या शहराची आधुनिकता आणि भव्यता नजरेसमोर भरते.येथील उंच इमारती पर्यटकांना रोमांचित करतात. विस्तीर्ण समुद्र, धबधबे, प्राणीसंग्रहालय, संग्रहालये, गॅलरी, किल्ले आणि राजवाडे पर्यटकांना खूप आकर्षित करतात. येथे वर्षभर पर्यटक येत असतात. टोरोंटो हे कॅनडातील सर्वात मोठे शहर आहे. या शहरात कला, चित्रपट निर्मितीची मोठी केंद्रे आहेत. येथे पर्यटकांचे मनोरंजन आणि पाहण्यासाठी खूप काही आहे. या शहरात अनेक देशांतील लोक राहतात. इथल्या संस्कृतीत अनेक रूपं पाहायला मिळतात. येथील शांत वातावरण आणि सीएन टॉवर आपल्या दिशेने येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित केल्याशिवाय राहत नाही.हा टॉवर अनेक किलोमीटर अंतरावरून दिसतो.सुमारे 550 मीटर उंच असलेल्या या टॉवरसमोर समुद्रकिनाऱ्यावर बांधलेल्या इतर उंच इमारती बटू वाटतात. द रॉयल ओंटारियो म्युझियममध्ये जागतिक संस्कृतीची झलक पाहायला मिळते. येथील प्राणीसंग्रहालय जगातील सर्वोत्तम प्राणीसंग्रहालयांमध्ये गणले जाते. या प्राणीसंग्रहालयात सुमारे चारशे साठ प्रजातींचे पाच हजार प्राणी राहतात. येथील कलादालनांमध्ये कॅनेडियन, युरोपियन, आफ्रिकन मातीच्या कलाकृती आणि इतर गोष्टी जमवल्या जातात.बाटा शू म्युझियम हे आकर्षणाचे केंद्र आहे. याशिवाय कापड संग्रहालय आणि वर्षातून एकदा होणाऱ्या जत्रेत शेकडो लोक सहभागी होतात. येथे मनोरंजक उद्याने, उंच इमारती, समुद्र किनारे, काशा लोमा किल्ला पर्यटकांचा प्रवास संस्मरणीय बनवतात.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
मोनाल : हिमालयात आढळणारा मनमोहक पक्षी
मोनाल पक्षी, ज्याचे सौंदर्यासाठी कौतुक केले जाते, त्याला उत्तराखंड आणि नेपाळचा राष्ट्रीय-राज्य पक्षी म्हणून मान्यता मिळाली आहे. मोनालचे नाव केवळ एका विशिष्ट प्रदेशापुरते मर्यादित नाही, तर जगातील सर्वात सुंदर पक्ष्यांमध्येही येते. कोंबडी प्रजातीचा हा सुंदर पक्षी वैज्ञानिक जगतात लोफोफोरस इम्पिजेनस या नावाने ओळखला जातो. मोनाल पक्षी नेपाळ आणि काश्मीरच्या बर्फाळ टेकड्या, हिमाचल प्रदेश, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, तिबेट आणि भूतानसारख्या पर्वतीय भागात आढळतो.नेपाळ आणि उत्तराखंडमध्ये याला डोफे म्हणून ओळखले जाते. हा बर्फाळ पर्वतांवर चार हजार मीटर उंचीवर आढळतो. हिमालयीन प्रदेशात आढळणाऱ्या मोनालचे पाय खूप मजबूत असतात आणि त्याची लांब वक्र चोच आहे.या पक्ष्याचे वजन सुमारे दोन किलोग्रॅम असते. त्याला हिमालयातील मोर असेही म्हणतात. मोनाल, इपलेस, स्क्लेरी, ल्युरी आणि लिफोपोरासेन्सच्या चार प्रजाती आहेत. हे मुख्यतः दोन किंवा अधिक संख्येने एकत्र पाहिले जातात. मोनाल हा लाजाळू पक्षी आहे. धोक्याची जाणीव झाल्यावर तो उडूही शकतो.नर मोनाल मादीपेक्षा अधिक सुंदर असतो. नर मोनालचा रंग तपकिरी आणि निळा असतो. त्याच्या अंगावर रंगीबेरंगी सुंदर पिसे असतात आणि डोक्यावर एक लांब तुरा असतो. तर मादी तपकिरी आणि काळी असते. त्याचे पंखही तपकिरी आणि काळे असतात.
नाही बांधत घरटे- स्त्री मोनालच्या तुलनेत, पुरुष मोनाल अधिक क्षुब्ध आणि आंदोलित, आक्रोशीत असतो.हिमाचल प्रदेशात नर मोनाल आणि मादी मोनाल वेगवेगळ्या नावांनी ओळखले जातात. येथील नर मोनलला बोनल आणि मादीला कर्डी म्हणतात. मोनल पक्षी घरटी बनवत नाहीत. ते अंड्यांसाठी खडक किंवा झाडाची पोकळी शोधतात. मादी मोनाल एका वेळी 4 ते 6 अंडी घालते. त्याच्या अंड्यांचा रंग हलका पिवळा असतो, जो एक ते दीड महिन्यात विकसित होतो. त्याच्या विशेष वक्र चोचीमुळे, मोनाल आपले अन्न जमिनीच्या आतून सहजपणे गोळा करतो. कीटकांव्यतिरिक्त, ते मुळे, फळे आणि फुलांच्या बिया देखील खातात.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
Sunday, June 25, 2023
माहीत आहे का तुम्हाला?
देशात प्रत्येक दोन मिनिटाला होतो सायबर अटॅक
आपला देश हॅकर्सच्या निशानावर आहे. देशात दिवसभरात 800 पेक्षा अधिक सायबर अटक होतात. दर तासाला ३३ वेळा डेटा तोडण्याचा प्रयत्न होतो, म्हणजेच दर दोन मिनिटांनी सायबर हल्ला होतो. आयआयटी कानपूरच्या सी3आय( C3i) लॅबमध्ये स्थापित हनीपॉट नेटवर्कवरून हे उघड झाले आहे. हे नेटवर्क यूएसए आणि जर्मनीमध्येही बसवण्यात आले आहे. या तीन देशांमध्ये दररोज 2500 हून अधिक सायबर हल्ले होतात.चीनकडून सर्वाधिक सायबर हल्ले होतात. भारत, अमेरिका आणि जर्मनीमध्ये दररोज सायबर हल्ले होतात.या देशांमधून होतात सायबर हल्ले- चीन 38 टक्के, व्हिएतनाम- 12 टक्के, रशिया 12, यूएसए 9 टक्के, तैवान 6 टक्के, युक्रेन 3 टक्के, नेदरलँड 2 टक्के, अन्य देश 18 टक्के
हल्ल्याचे स्वरूप कसे शोधले जाते? आयआयटी ( IIT) ने क्लाउडवर युनिव्हर्सल डोमेन वेबसाइट तयार केली आहे. शास्त्रज्ञांनी त्याला एक आकर्षक सापळा बनवले आहे. हे हॅकर्सना सहजपणे डेटा घेण्यास आकर्षित करते. हॅकरने त्यावर क्लिक केल्यावर शास्त्रज्ञांना त्या हल्ल्याचा नमुना कळतो.
२० वर्षांपासून तयारी, भन्साळींनी सुरू केला 'बैजू बावरा'
संजय लीला भन्साळी हे अशा दिग्दर्शकांपैकी एक आहेत ज्यांच्या चित्रपटांची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत असतो. आपला चित्रपट रुपेरी पडद्यावर येण्यापूर्वी वर्षानुवर्षे त्यावर काम करत राहणं, यावर त्यांचा विश्वास आहे.विशेष म्हणजे त्याचा पुढचा 'बैजू बावरा' हा प्रकल्पही गेल्या दोन दशकांपासून त्याच्या मनात घोळत होता. हे त्यांचे एक दीर्घकाळचे स्वप्न होते, जे अखेर पूर्ण होत आहे.आता रिपोर्ट्सनुसार, 20 वर्षांच्या विचार आणि प्लॅनिंगनंतर संजय लीला भन्साळी 'बैजू बावरा'ला पडद्यावर साकार करण्यासाठी सज्ज झाले आहेत. गेल्या काही वर्षांत त्यांनी चित्रपटाच्या प्रत्येक मिनिटाच्या तपशीलावर अत्यंत काळजीपूर्वक काम केले आहे.दोन गायकांभोवती फिरणारी ही कथा पूर्णपणे संगीतमय असणार आहे.
याशिवाय 'बैजू बावरा'च्या कास्टिंगबद्दल सांगितले जात आहे की, या चित्रपटात रणवीर सिंग आणि आलिया भट्ट दिसणार आहेत. मात्र, याबाबत सध्या कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. सांगायची गोष्ट अशी की यापूर्वी 'बैजू बावरा' या नावाचा चित्रपट विजय भट्ट यांनी 1952 साली बनवला होता.या चित्रपटात भारत भूषण यांनी बैजू वाबरा याची आणि सुरेंद्र यांनी तानसेनची भूमिका साकारली होती. आणि मीना कुमारी या चित्रपटाची नायिका होती. या चित्रपटासाठी मीना कुमारीला 1964 मध्ये पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.
बैजू बावरा ही एका अशा अज्ञात गायकाची कथा आहे जो तानसेनचा पराभव करून आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्याचा प्रयत्न करतो.मूळ चित्रपटात 13 गाणी होती आणि चित्रपटाला संगीत नौशाद यांनी दिले होते. ज्यासाठी त्यांना त्यांच्या आयुष्यातील एकमेव फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर त्याकाळी 1.25 कोटींची कमाई केली होती.
नॉलेज पॉवर
1. बर्लिन ही कोणत्या देशाची राजधानी आहे?
(a) जपान (b) चीन (c) जर्मनी
2. बुर्ज खलिफा इमारत कोठे आहे?
(a) व्हिएतनाम (b) दुबई (c) काबूल
3. अशी कोणती संख्या आहे, जी जोडल्यावर आणि गुणाकार केल्यावर समान संख्या मिळते?
(a) चार (b) तीन (c) दोन
4. लोटस टेंपल पाहण्यासाठी तुम्हाला कुठे जावे लागेल?
(a) दिल्ली (b) मुंबई (c) कोलकाता
5. मेरी कोम कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
(A) कबड्डी (B) हॉकी (C) बॉक्सिंग
6. जगात सर्वाधिक भूकंप कोणत्या देशात होतात?
(a) चीन (b) जपान (c) जर्मनी
7. रॉक गार्डन पाहण्यासाठी तुम्हाला खालीलपैकी कोणत्या शहरात जावे लागेल?
(a) चंदीगड (b) जयपूर (c) इंदूर
8. आयपीएल कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
(A) हॉकी (B) क्रिकेट (C) फुटबॉल
9. जर तुम्ही मुंबादेवी मंदिर परिसरात असाल तर तुम्ही कोणत्या शहरात आहात?
(A) शिमला (B) मुंबई (C) भुवनेश्वर
10. रणजी करंडक कोणत्या खेळात दिला जातो?
(A) कबड्डी (B) व्हॉलीबॉल (C) क्रिकेट
उत्तर- 1.जर्मनी 2.दुबई 3.दोन 4.दिल्ली 5.बॉक्सिंग 6.जपान 7.चंदीगड 8.क्रिकेट 9.मुंबई 10. क्रिकेट
Monday, June 12, 2023
(ट्रॅव्हल्स कॉर्नर) 52 मंदिरांचे मुक्तागिरी
विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरापासून काहीच अंतरावर सातपुडा पर्वतात मुक्तागिरी धबधबा आहे. अतिप्राचीन मंदिरालगत जवळपास 250 फूट उंचावरून हा धबधबा कोसळतो. मध्यप्रदेशातून वाहत येणारी नाग नदीच्या प्रवाहामुळे हा धबधबा तयार झालाय. उंचावरून धबधब्याच्या रूपाने कोसळणारे पाणी त्याचप्रमाणे पाण्यातून उडणारे तुषार या सर्वाचा आनंद पर्यटक घेत असतात. खळखळ वाहणारी नाग नदी, तिचे उंचावरून कोसळणारे धबधब्याच्या रूपात पाणी, त्याचे अंगावर उडणारे तुषार अशा मनमोहक दृश्यांनी जैनाच्या काशीवर निसर्गाची उधळण ही पावसाळ्यात पर्यटकांची पावले आकर्षित करतात.
मेंढागिरी आताची मुक्तागिरी या ठिकाणी जैन धर्माची ५२ मंदिरे आहेत. या मंदिरांचे वैशिष्ट्य म्हणजे ही सर्वच मंदिरे वेगवेगळ्या शतकातील आहेत. काही पंधराव्या तर काही सोळाव्या शतकातील अतिप्राचीन मंदिरे असून, ती 400 फूट उंच पर्वतावर वसलेली आहेत. चारशे फुटांवरून कोसळणारा धबधबा या ठिकाणी पहावयास मिळतो. विशेष म्हणजे दहाव्या क्रमांकाचे मंदिर अकृत्रिम चैतालय म्हणून ओळखले जाते. या सर्व मंदिरांची निर्मिती एलिसपूरच्या (आताचे अचलपूर) इल राजाने केली. एक हजार वर्षांपूर्वीची भगवान पार्श्वनाथाची मूर्ती या ठिकाणी असून, शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. आजही ही अष्टमीला व पौर्णिमेला केशर चंदनाचा या ठिकाणी वर्षाव होतो. मुक्तागिरीला पूर्ण पाहण्यासाठी ४०० पायऱ्या व उतरताना ५०० पायऱ्या लागतात. 250 फुटांवरून कोसळणारा धबधबा भुरळ घालतो. लाकडापासून तयार केलेला रथ यात्रेच्या वेळी बाहेर काढला जातो. दिवाळीनंतरच्या पोर्णिमेला या ठिकाणी जत्रा भरते. येथील व्यवस्थापन पूर्वी धर्मापीठाकडे होते. श्री पद्यानंदजी स्वामीजी त्या धर्मपीठाचे पीठाधीश होते. भक्तांसाठी येथे भक्त निवासाची व्यवस्था आहे. भोजनालयसुद्धा सुरू राहते. आजही या ठिकाणी जैन धर्माच्या ऋषीमुनीची ये-जा सुरू राहते. पावसाळ्यात या ठिकाणी पर्यटकासह भक्तांची गर्दी बघायला मिळते. जैनांची काशी म्हणून मुक्तागिरीची ओळख आहे. मुक्तागिरीला जाणारा मार्ग अमरावती ते परतवाडा ५० किलोमीटर, परतवाडा ते खरपी आठ किलोमीटर, खरपी ते मुक्तागिरी सात किलोमीटर. संस्थानच्या गाडीची व्यवस्था आहे.
Sunday, June 11, 2023
मालमत्ता खरेदी करताना घ्यावी दक्षता
एखाद्या व्यक्तीने आयुष्यभर केलेली सर्वात मोठी गुंतवणूक म्हणजे मालमत्ता, हे खरे असले तरी मालमत्ता खरेदी प्रक्रियेत सावधगिरी बाळगली पाहिजे. खरेदीदारांनी खरेदी करीत असलेल्या मालमत्तेची सखोल संशोधक वृत्तीने माहिती घेतली पाहिजे. आणि सर्व कायदेशीर औपचारिकता पूर्ण करणे आवश्यक आहे. खरेदी करण्याचे नियम वेगळे आहे. शहरातील मालमत्तेच्या वाढत्या किंमती आणि भविष्यात ग्रामीण भागाचा शहरांमध्ये समावेश होण्याची उच्च क्षमता यामुळे ग्रामपंचायत क्षेत्रात जमिनी खरेदी करण्यासाठी पसंती मिळत आहे. लेआउटच्या सूचना आणि नियम
ग्रामपंचायतीच्या जमिनी संबंधित गावाच्या अधिकारात येतात. ज्या त्या ठिकाणाच्या क्षेत्रानुसार मालमत्ता खरेदी आणि विक्रीची मार्गदर्शक तत्त्वेबदलतात. जर जमीन शहराच्या सीमेवर नसेल तर हे नियम अधिक महत्त्वाचे बनतात. अशा प्रकरणांमध्ये खरेदीदाराने पंचायत लेआउटच्या नियमांचा आदर केला पाहिजे. या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केल्याने मालमत्ता करार सुरक्षित आणि कायदेशीर कलमांपासून मुक्त असल्याची खात्री होते. मोकळी जागा सोडण्यासाठी सूट ग्रामपंचायत क्षेत्रातील भूखंडांवर निवासी जागा बांधण्यासाठी काही बांधकाम नियम आहेत. घरांच्या आराखड्याचे नियोजन करताना बिल्डरने जमिनीच्या एकूण क्षेत्रफळच्या 1/3 जागा ओपन पीस म्हणून सोडली पाहिजे. खरेदीदाराने यासंदर्भात ग्रामपंचायतकिंवा शहराकडून अधिक माहिती गोळा करावी.काही प्रकरणांमध्ये खुल्या क्षेत्राच्या आवश्यकतांसाठी सूट आहे. बांधकामाच्या जागेवर आणि आसपासच्या परिसरावरही बरेच काही अवलंबून आहे. शहराच्या
जमिनीच्या किमती - ग्रामपंचायती क्षेत्रातील भूखंड बहुतांशी कमी किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे अश्या जमिनींचे योग्य दस्तऐवज असणे अत्यंत आवश्यक आहे. मालमत्ता व्यवहार सुरळीत होण्यासाठी हे आवश्यक आहे. ग्रामपंचायतीच्या जमिनीच्या किंमतीही जागेवर अवलंबून असतात.
कनेक्टिव्हिटी पर्याय आणि सुविधा -ग्रामपंचायत क्षेत्रातील जमीन खरेदी करताना कनेक्टिव्हिटी पर्यायांकडे दुर्लक्ष केळे जाऊ नये. सहज पोहोचण्यासाठी मालमत्ता रस्त्यांशी जोडलेली असावी. पाणी पुरवठा आणि ड्रेनेज सुविधांसाठी जमीन कालवे, धरणे आणि जलकुंभांच्या जवळ असावी. जमिनीच्या जवळून वाहणारी नदी नसावी. असे स्थान निवासी जागा बांधण्यासाठी योग्य नाही.
बिल्डिंगसाठी प्लॅन मंजूर करून घेताना जागेचा लेआऊट मध्ये दाखवलेली मोकळी जाग ही कधीही बदलून त्यावर इमारत बांधता येत नाही . तसेच बंगलो प्लॉटचे ले आऊट कलेक्टर कडून, तहसीलदार यांच्याकडून मंजूर केलेले असतात. ही मोकळी सोडलेली असते. सदर मोकळ्या जागेची मालकी ही सर्व प्लॉट मालकांची मिळून असते. तांत्रिक व कायदेशीर सल्लागार यांचेकडून माहिती घेऊन सर्वसामान्यांनी प्लॉट खरेदी करावा. म्हणजे फसवणूक टाळता येऊ शकेल.
शासनाचे, लोकल बॉडीचे डेव्हलपमेंट कंट्रोल रुलप्रमाणे सदर मोकळी जागाही सोडणे बंधनकारक असते . कारण अशी जागा सोडली नाही तर लोकांना श्वास घेण्यासाठी हवा मिळणार नाही. शहारामधे सध्या जागेचे दर हे गगनात गेले आहेत. सर्व फ्लॅट तसेच प्लॉट खरेदीदार लोकांनी जागृत होऊन सोसायटी स्थापन करावी. सोसायटी स्थापन झाली की चार महिन्यांचे आत आपणास जागेची खरेदी करून देणे बिल्डरला बंधनकारक आहे.
मानवी वस्तीजवळ आढळणारी साळुंखी
मे-जूनच्या दरम्यान साळुंकी पक्ष्याचा कलकलाट सुरु झाला की, समजावं पावसाचं वातावरण सुरु झाले. अधेमधे अवकाळी पावसाचे टपोरे थेंब, मृदगंधाचा दरवळ आणि इकडे जोडीने वावरणाऱ्या साळुंक्या मंजूळ, कर्कश आवाज प्रसंगानुरूप काढत असतात. मग समजायचे की, साळुंकीनं आपल्या परिसरातील झाडांवरील ढोलीत किंवा घराच्या वळचणीला, भिंतीमध्ये किंवा कोनाड्यात घरटं बांधलेलं असावं. साळुंकी ही सर्वभक्षक असून फळे, धान्य, गांडुळे, टोळ, सर्व प्रकारच्या किडी फस्त करते. परिणामी शेत पिकांचे संरक्षण होते, म्हणून शेतकऱ्यांबरोबर सर्वांनाच साळुंकीचं महत्त्व आहे.
कागद, पिसे, चिंध्या, गवतांच्या पात्यांपासून नर-मादी मिळून घरटे बांधतात. वर्षानुवर्षे हेच घरटं साळुंक्या डागडुजी करून वापरतात. वर्षानुवर्षे मग ती परिसरात दिसू लागते. अशी घरटी तुम्ही पाहिलीही असतील. शहर परिसरात किंवा जिल्ह्यात जी साळुंकी दिसते, तिला पोपई मैना किंवा भांगपाडी, चन्ना हुडी म्हणतात. या साळुंकीच्या डोक्यावर भांग पाडल्यासारखी पिसं असतात.भारतीय उपखंडात असलेल्या साळुंकीचे शास्त्रीय नाव ॲक्रिडोथिरिस ट्रायस्टिस (Acridotheres tristis) असे आहे. साळुंकीचा विणीचा हंगाम प्रदेशानुसार बदलतो. तिची वीणीचा हंगाम वर्षातून दोन ते तीन वेळा असतो. सध्या एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान वीणीचा हंगाम सुरु असल्याने साळुंकी कलकलाट करताना दिसते.
निरनिराळे हवामान, अधिवासात जुळवून घेण्याची क्षमता साळुंकीत असते, म्हणून मानवी वस्तींजवळ ती जास्त दिसते. तिच्या काही प्रजाती जंगलामध्ये हो आढळतात. भारतीय उपखंडात तिच्या पाच उपप्रजाती दिसतात. नर-मादी दिसायला सारखे असतात.
साळंक्या जोडीने राहतात. नर-मादीचे एकमेकांवर प्रेम
असते. दोघेही जमिनीवर एका ठिकाणीच भक्ष्य टिपीत हिंडतात. मध्येच थांबून एकमेकांची पिसे चोचीने साफ करतात. विचित्र अंगविक्षेप करतात. मादी साळुंकी मिजासखोर असते. तिच्या सर्व हालचालींत आत्मविश्वास दिसतो. बोलाविण्याकरिता, रागावल्यावर, आनंद व्यक्त करण्याकरिता ती वेगवेगळे आवाज काढते. मादीचे लक्ष वेधण्यासाठी नर विशिष्ट आवाज काढतो. साळुंक्यांची झोपण्याची रीत कावळ्यांसारखीच असते. साळुंकीचा कलकलाट सुरु झाला की, सर्वांचेच लक्ष तिकडे वेधले जाते.
ज्ञान दीर्घकाळ लक्षात ठेवायचे असेल तर काय करायला हवं?
जर तुम्हाला कोणतेही ज्ञान दीर्घकाळ लक्षात ठेवायचे असेल तर ते तुमच्या शब्दात लिहिण्याची कला विकसित करा. जेव्हा आपण काहीतरी नवीन शिकतो तेव्हा आपण ते ज्ञान दीर्घकाळ लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतो.यासाठी एक चांगली युक्ती म्हणजे नवीन शिकलेले ज्ञान तुमच्या स्वतःच्या शब्दात लिहा. याचे कारण असे की जेव्हा आपण एखादा विषय आपल्या शब्दात व्यक्त करतो तेव्हा आपल्या मनात त्या ज्ञानाशी एक खोल संबंध निर्माण होऊ लागतो. आम्हाला आमच्या अनुभवाच्या संदर्भात ते समजून घेण्याची संधी मिळते आणि ते पटकन आठवते. जेव्हा आपण कोणतेही ज्ञान आपल्या भाषेत लिहितो आणि समजतो तेव्हा आपली विचारधाराही बळकट होते. या प्रक्रियेत आपण ज्ञानाचे विविध पैलू समजून घेतो आणि त्याचा सारांश देतो. त्यामुळे आपल्या मनात त्या विषयाची ओळख आणि स्मरणशक्ती मजबूत होते. या प्रक्रियेमुळे आपली स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. जेव्हा आपण आपल्या भाषेत ज्ञान लिहितो तेव्हा आपल्याला ते विचारपूर्वक आणि सखोलतेने समजून घेण्याची संधी मिळते.आम्ही आमची विचारसरणी सुधारतो आणि नवीन कल्पना विकसित करतो. यामुळे आपली स्मरणशक्ती विकसित होते.
Saturday, June 10, 2023
लाजाळू पक्षी: बटन लावा
पिवळ्या पायांचा बटन लावा हा पक्षी लाजाळू असून तो गवताळ आणि खुरट्या वनात आढळतो. तो सहसा दिसत नाही. हा पक्षी कोंबडीच्या पिल्ला एवढा आहे. इंग्रजीत त्याला 'यलो लेग्ड बटन क्वाइल' असे म्हटले जाते. मादी नरापेक्षा अधिक सुंदर आणि आकाराने मोठी असते. तिला गळ्यामागे नारंगी पिंगट रंगाचा रुंदा पट्टा असतो. पाय व चोच पिवळी जर्द असते आणि हीच तिची ओळख ठरते. उडताना तिची नारंगी तांबूस गळपट्टा, छाती व खालून पांढरा रंग ठळक दिसतो. नराला गळपट्टा नसतो व रंगाने फिकट असतो. पावसाळा हा त्यांचा विणीचा काळ असतो. या काळात मादी नराला अन्न पुरवते. अंडी घातल्यावर मादी नरावर अंडी उगवण्याची जबाबदारी देत निघून जाते. लावा पक्ष्याप्रमाणे त्याच्या पायाला चौथे बोट नसते. माळढोकच्या पायाशी साधर्म्य असल्याने त्यांना 'बस्टर्ड क्वाइल' गटात गणले जाते.
त्यांच्या आहारात हिरव्या वनस्पती सामग्री, बियाणे, आणि बीटल, मुंग्या आणि तळागाळातील विविध कीटकांचा समावेश आहे.हिमांशू टेंभेकर म्हणाले की , या पक्ष्याची काही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. त्यात इतर लावा पक्ष्यांप्रमाणे याला पायाला चौथा बोट नसतो. माळढोकच्या पायाशी साधर्म्य असल्याने त्यांना "bustard Quail" ह्या गटातही गणले जाते.या पक्ष्याच्या माद्या ह्या बहुपतित्व पद्धतीचा अवलंब करता म्हणजेच एका विणीच्या हंगामात अनेक नरांशी समागम करून घरटी बनवून अंडी देतात. पावसाळ्यात मानवी वस्ती जवळ सुरक्षेसाठी त्या वावरत असतात व कधी कधी ग्रामीण भागात घरात देखील शिरतात. मुख्य म्हणजे महाराष्ट्रात ह्या पक्ष्याच्या हातावर मोजण्याइतक्या नोंदी आहे रहिवासी असून इतक्या कमी नोंदी असण्याचे कारण म्हणजे हा पक्षी खूप लाजाळू असतो तसेच तो केवळ पावसाळ्यातच आवाज करतो त्यामुळे त्याला शोधणे आणि त्याचा एकूण अभ्यास करणे कठीण आहे. अलीकडे हा पक्षी मध्यप्रदेश कान्हा राष्ट्रीय उद्यानातीलअभयारण्य व महाराष्ट्रात धुळ्यात आढळून आला आहे. भारतात लावा पक्ष्याच्या सात जाती आढळून येतात. त्यात करड्या रंगाचा लावा मोठ्या प्रमाणात आढळून येतो.
छायाचित्र सौजन्य सकाळ
Wednesday, June 7, 2023
माहिती आहे का? महाराष्ट्र भारतातील 'आयटी'ची जननी
भारतात येणाऱ्या परकी चलनातला ३० टक्के वाटा माहिती तंत्रज्ञानाचा आहे. पूर्वी जे महत्त्व कोळसा, तेल या मूल्यवान गोष्टींना असायचे, ते आता 'डेटा'ला आहे. क्लाऊड कम्प्युटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अशा अनेक गोष्टीतील क्रांती जगाचे भविष्य बदलवणार आहे. या क्षेत्रात काम करणारे ७५ टक्क्यांहून जास्त लोक भारतीय आहेत. ते जगभरात ठिकठिकाणी काम करत आपल्या कौशल्यामुळे परकी चलन मिळवतात. व्यक्तिगत समृद्धीतून विकास साधतात. सातासमुद्रापार जाऊन जे श्रेय ही मंडळी कमवत आहेत, ती प्रज्ञा येथे भारतात टिकावी, उत्पन्नवाढीत लाभदायक ठरावी यासाठी जे प्रयत्न होताहेत, त्याचाच भाग म्हणजे विविध राज्यांनी माहिती तंत्रज्ञानविषयक व्यवसाय मिळवण्यासाठी सुरु केलेले प्रयत्न. सध्याची आकडेवारी पाहिली तर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर असलेल्या भारतातल्या राज्यांमध्ये पहिला क्रमांक आहे तो कर्नाटकाचा. तेलंगणा, आंध्रप्रदेश, तमिळनाडू, महाराष्ट्र ही आयटीतली अन्य महत्त्वाची नावे आहेत. यात कर्नाटकाचा वाटा ५८ लाख कोटींचा आहे. महाराष्ट्र क्रमांक दोनवर आहे; पण मोठ्या फरकाने. केवळ २८ लाख कोटींचा महाराष्ट्राचा आयटी व्यवसाय आहे. खरे तर महाराष्ट्र भारतातल्या आयटीची जननी आहे. १९६७ मध्ये महाराष्ट्रात 'टीसीएस'ची स्थापना झाली. भारतातले पहिले 'सीप्झ' १९७३मध्ये महाराष्ट्रात मुंबईत स्थापन झाले. पण गेल्या काही वर्षात महाराष्ट्राचा हा लौकिक मागे पडला आहे. स्पर्धा तीव्र होते आहे. महाराष्ट्राने स्वत:चे स्थान अव्वल करण्याच्या प्रयत्नांतर्गत नव्या आयटी धोरणाची घोषणा केली आहे. महाराष्ट्रात कुठेही माहितीतंत्रज्ञान उद्योग स्थापन केला तर मोफत विजेपासून ते 'आवश्यक सेवा कायद्या'तील सर्व सवलती लागू होणार आहेत. आता या सवलती परदेशी; तसेच देशी गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचवणारे प्रयत्न सुरू व्हायला हवेत.
देशात ५० वर्षात ५७३ आपत्ती
जागतिक हवामान संस्थेच्या माहितीनुसार १९७० ते २०२१ या ५० वर्षांच्या काळात भारताला हवामानाशी संबंधित सुमारे ५७३ आपत्तींचा सामना करावा लागला. या आपत्तींमध्ये लाख ३८ हजार 3७७ जणांचा मृत्यू झाला. त्याचप्रमाणे, २०२२ मध्ये अशा आपत्तींमुळे २,७७० जणांना प्राण गमवावा लागला. देशातील नागरिकांसाठी अत्यंत प्रतिकूल हवामानाचा इशारा लवकरच टोव्हो तसेच रेडिओवरूनही देण्यात येणार आहे. टीव्हीच्या पडद्यावर हा इशारावजा संदेश झळकेल. रेडिओवरील कार्यक्रम मध्येच थांबवून हवामानाचा इशारा दिला जाईल. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एनडीएमए) अलीकडे मुसळधार पाऊस, मेघगर्जनेसह कोसळणारा पाऊस आणि उष्णतेच्या लाटा आदींबद्दलची महत्त्वाची माहिती मोबाईलवर मेसेजच्या माध्यमातून पाठविण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर, आता पुढील पाऊल टाकत टीव्ही, रेडिओ आणि इतर माध्यमांवरून नागरिकांना खराब हवामानाबद्दलची माहिती पाठवून त्यासाठी सज्ज राहण्याचा सल्ला दिला जाईल. एनडीएमए'च्या अधिकाऱ्याने सांगितले, की मोबाईलवरून नागरिकांना हवामानाच्या इशाऱ्याचे मेसेज पाठविणे हा पहिल्या टप्प्याचा भाग आहे.
देशात दोन लाख ३० हजार कोटींपेक्षा जास्त बेवारस संपत्ती
जगातील सर्व देशांमध्ये, थोड्या फार फरकाने, कोणीही हक्क न सांगितल्याने लक्षावधी प्रमाणात रक्कम बेवारस पडून आहे. अशी कोणीच दावा न केलेली रक्कम बहुतांश प्रमाणात मृत झालेल्या व्यक्तोंची आहे आणि त्यांच्या वारसांना त्यांच्या पूर्वजांच्या गुंतवणुकीच्या तपशिलांची माहिती किंवा कल्पना नसावी. काही प्रमाणात जिवंत व्यक्तींची; पण संपत्ती दावा न केल्यामुळे सरकारजमा झाली आहे. भारतात दावा न केलेल्या मालमत्तेचे मूल्य रु. २, ३०,००० कोटींपेक्षा जास्त आहे. अशा विनादावा ठेवोंमध्ये बँकेतील जमा ठेवी, शेअर आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक, भविष्यनिर्वाह निधी, पीपीएफसारख्या सामाजिक सुरक्षा योजना, पोस्ट ऑफिस गुंतवणूक पर्याय, विमा पॉलिसी अशा चार प्रमुख प्रकारांतील ठेवींचा समावेश आहे.
रिझर्व्ह बँकेने १२मे २०२३ रोजी एक आदेश सर्व बँकांसाठी काढून प्रत्येक बँकेने प्रत्येक जिल्ह्यात सर्वांत जास्त रकमेच्या दावा न केलेल्या १०० ठेवी १०० दिवसांत परत करण्याची मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत. एक जून २०२३ पासून १०० मालमत्तांचा १०० दिवसांत परतावा करण्याच्या या मोहिमेला सुरुवातही झाली आहे. ज्येष्ट व प्रख्यात पत्रकार सुचेता दलाल यांनी ज्येष्ठ वकील अँड. प्रशांत भूषण यांच्याद्वारे सर्वोच्च न्यायालयात असा डेटा उपलब्ध व्हावा म्हणून दावा दाखल केला आहे. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने ही मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत. सुचेता दलाल यांच्या प्रयत्नांना यश आले असून, अनेक सर्वसामान्य नागरिकांना या ठेवी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Thursday, June 1, 2023
भिंतीवरील घड्याळाची 'टिकटिक' कायम
एलईडी, डिजिटल, स्मार्ट (वॉच) घड्याळे आली. मोबाईलमध्ये घड्याळ आले. तरीही भिंतीवर मात्र घड्याळ हवेच, हा आग्रह अजूनही कायम आहे. तंत्रज्ञान जसे बदलत गेले, तशी घड्याळ्यांचे रुप, आकार, रंग, अंतर्गत रचनेत काहीसे बदल होत गेले.भिंतीवर जरी घड्याळ घेतले तरी घड्याळ कुठल्या दिशेला हवे, याचेही एक वास्तूशास्त्र निर्माण झाले आहे.
तुमच्या घराची रचना जशी असते, तशा पद्धतीने कोणती घड्याळे घ्यावीत, हे इंटिरिअर डिझाईनर सांगतात. मग त्यापद्धतीने घड्याळ घेतले जाते. अजंटा, ओरेव्हा, ऑरपॅट, सेझ, सिको, केझर, वर्ल्ड ट्रॅव्हल्स, थॉमस केंट, कॉपर प्लेटींग, अल्युमिनिअर/कॉपरची रचना असलेली, ओक वुड, सॉफ्ट वुड, बझर, गिअर सिस्टम, कुक, ड्युएल सिस्टीम, हॅगीग वॉल, लंडन म्युझिक, कॅसल म्युझिक, एलईडी, डिजिटल, नाईट ग्लो, पेंड्युलम, रोमन, सिंपल आकडे, कॅलौबर आकडे असलेली घड्याळे उपलब्ध आहेत. यातील क्वार्टझची रचना असलेल्या घड्याळांना ग्राहकांकडून अधिक मागणी असते. तसेच इथनिक ब्रॅड, अँटीक पीस असलेली घड्याळे घेणारे ग्राहकही खूप आहेत. इथनिक/ अँटीक पीस घड्याळांची किंमत मुळात १५ ते २० हजार रुपयांपर्यंत असते.
सर्वसाधारणपणे भिंतीवरील घड्याळाची रचना ही गोलाकार असते; पण अलोकडे चौरस, कप बशी आकार, आयताकृती, अंडाकृती, लंबक आकार, पंचकोन, अँब्स्ट्रॅक्ट (अमूर्त) डिझाईन्सचे ट्रेंडस् मार्केटमध्ये दिसतात. भिंतीच्या रंगाला अनुकूल घड्याळे घेण्याचा एक कल दिसतो. घड्याळ घरात नेमके कुठे लावायचे, हासुद्धा एक विचार असतो. मगच घड्याळ घेतले जाते. घड्याळांमध्ये होडी, नौका, वॉर बोट, हत्ती, रेनडिअर, मोर, पक्षी, प्राणी, निसर्गातील विविध घटकांनुरुप रचना केलेली पाहायला मिळते. काही घड्याळे भारतीय बनावटीची तर काही परदेशातील कंपन्यांनी निर्माण केलेली आहेत. अशी सर्व घड्याळे आज बाजारात उपलब्ध आहेत, हे विशेष. परदेशी घड्याळे ही तुलनेने महाग आहेत.
कुणाच्याही घरची वास्तू असते, तेव्हा गिफ्ट व्हॉऊचरमध्ये घड्याळ ठेवले जाते. प्रियजनांचीही गिफ्ट खूप लोक घरात जपून ठेवतात. जरी घड्याळ कालांतराने खराब झाले तरी आठवण म्हणून घड्याळाचा सांगाडा ठेवला जातो. कारण घड्याळ हे भरभर सुटून जाणाऱ्या काळाचे एक प्रतीक आहे. कोणत्याही घरात अशी आठवण ठेवलेली घड्याळे पाहायला मिळतात. वायडनिंग (चावीची) घड्याळे मात्र कालबाह्य झाली. यासाठी जे घड्याळ आवडते, ते दिले जाते.
हौसी लोक गुगल, सोशल साईटस्वर जाऊन घड्याळांची माहिती घेतात. एखाद्या घड्याळाची रचना आवडली की, ते घड्याळ ऑनलाईन मागवतात किंवा दुकानदाराकडे जातात. असे घड्याळ तुमच्याकडे आहे का? नसेल तर ते तुम्ही किती दिवसात उपलब्ध करून देता, अशी विचारणा करतात. दुकानदार अनेक घड्याळांचे आकार, रंग, आवाज, रचना असलेले आगळीवेगळी घड्याळे भिंतीवर टांगतात. एखादे घड्याळ आवडले की, ते घेऊन जातात.
शेतकऱ्यांचा खास मित्र: खोकड
खोकड हा एक लहान आकाराचा सस्तन प्राणी आहे.हा मांसाहारी गणाच्या कॅनिडी कुलातील आहे. या कुलात कुत्रा, लांडगा, कोल्हा, वन्य कुत्रा, इ. प्राणी ये...
-
तंत्रज्ञानाच्या या विश्वात 20 वर्षे घालवल्यानंतर, डॉ तथागतो राय यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेने सुसज्ज असे उपकरण तयार केले आहे जे एका मिनिटात म...
-
रोबोट आता बरीच कामे करीत आहे. घर, ऑफिस ची साफसफाई करतो, जेवण सर्व्ह करतो. गाणी म्हणतो, रुग्णांची सेवा करतो. इतकेच नव्हे तर रोबोट रुग्णांवर श...
-
आपल्या देशात नद्यांना मातेचा दर्जा देऊन त्यांची पूजा केली जाते.जसे की गंगा नदीला सर्वात पवित्र नदी म्हटले जाते आणि या नदीची माता म्हणून पूजा...










