Friday, March 31, 2023

भारताने तब्बल साडेसहा लाख हेक्टर जंगल गमावले


भारताने सन 2015 ते 2020 या काळात तब्बल सहा लाख 68 हजार 400 हेक्‍टर जंगल गमावले आहे. जंगलांच्या ऱ्हासाच्या संदर्भात भारत ब्राझीलपाठोपाठ दुसरा क्रमांकावर आहे. यासंदर्भातील अभ्यास https://ourworldindata.org/ या आंतरराष्ट्रीय संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आला आहे. जगातील सुमारे 98 देशांमध्ये गेल्या 30 वर्षांत झालेल्या जंगलतोडीची माहिती या अभ्यासात दिली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेच्या आकडेवारीच्या आधारे हे विश्लेषण करण्यात आले आहे.

वर्ष 1990 ते 2000 आणि 2015 ते 2020 या काळातील माहिती आणि आकडेवारीच्या आधारे हे विश्लेषण करण्यात आले आहे. जगाचा विचार करता मागील 30 वर्षात भारतात सर्वाधिक जंगलतोड झाली आहे. त्यातही, 2015 ते 2020 या काळात ही जंगलतोड प्रचंड प्रमाणात करण्यात आली. या काळात भारतात सहा लाख 68 हजार 400 हेक्‍टर जंगल तोडले गेले. 1990 ते 2000 या काळात तीन लाख 84 हजार हेक्‍टर जंगल देशाने गमावले होते. इतर देशांच्या तुलनेत देशातील जंगलतोडीची गती सर्वाधिक आहे. भारताच्या वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागवण्यासाठी ही जंगलांची तोड करण्यात आल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. जंगलतोडीचा वेगही अधिक सन 1990 ते 2000 या काळात झालेल्या ऱ्हासाच्या तुलनेत 2010 ते 2020 याकाळात भारतात झालेल्या जंगलतोडीचा वेग हा जगात सर्वाधिक आहे. या काळातील जंगलतोडीच्या वेगाच्या बाबतीत झांबिया दुसर्‍या क्रमाकांवर असल्याचे या अहवालात म्हटले आहे. भारतात 1090 पर्यंत तृक्षतोडीचे प्रमाण आणि गती फारच कमी होती. मात्र, त्यानंतरच्या एका दशकात जंगलतोठीचे प्रमाण एकाएकी वाढले आणि पुढील प्रत्येक दशकात ही स्थिती कायम राहिली.
कारणे कोणती? वाढणारी लोकसंख्या, शेतजमिनीचे वाढलेले क्षेत्र, उपभोगाचे वाढलेले प्रमाण आणि हवामानबदल अशा विविध कारणांमुळे जंगलांचा ऱ्हास झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. मार्च महिन्यातच हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.

Thursday, March 30, 2023

केंद्रात 9.79 लाखांहून अधिक पदे रिक्त

वाढत्या बैरोजगारीबद्दल नेहमी बोलले जाते; परंतु १ मार्च २०२१ पर्यंत रेल्वेमधील सर्वाधिक २.९३ लाख पदांसह विविथ केंद्र सरकारच्या विभागांमध्ये तब्बल ९७९ लाखांहून अधिक रिक्‍त पदे आहेत. खुद्द केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी बुधवारी ही माहिती दिली. 

भाजपचे सदस्य सुशील कुमार मोदी यांनी राज्यसभेत विचारलेल्या प्रश्‍नाच्या लेखी उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. केंद्र सरकारची विविध मंत्रालये, विभाग आणि संस्थांच्या आवश्यकतेनुसार रिक्‍त पदे भरण्याची प्रक्रिया निरंतर सुरू आहे, असे सिंह म्हणाले. 

सरकारने आधीच सर्व मंत्रालये/विभागांना न भरलेली पदे वेळेवर भरण्यासाठी सूचना जारी केल्या आहेत.अशी आहे रिक्‍त पदांची संख्या (लाखांत) 

@ संरक्षण (नागरी) : २.६४ , गृह विभाग: १.४३  , टपाल खाते : ९०,०५० , महसूल : ८०२४३ ,भारतीय लेखापरीक्षण विभाग : २५,९३४, अणुऊर्जा विभाग; ९४६० 


 




Monday, March 27, 2023

वाघांची खरी संख्या किती ?


२०१८ मध्ये झालेल्या गणनेत देशात २ हजार ९६२ वाघ असल्याचे जाहीर केले होते. तेव्हा ३० टक्के वाघांची संख्या वाढली होती. यंदा वाघाच्या संख्येत अंदाजे ३० ते ४० टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अंदाजे ४५०० ते ४७०० पर्यंत वाघांची संख्या जाईल असे सांगितले जाते.  या बहुप्रतीक्षित अखिल भारतीय व्याघ्रगणनेचा अहवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ९ एप्रिल रोजी म्हैसूर येथे प्रसिद्ध केला जाण्याची शक्यता आहे. व्याघ्र प्रकल्प घोषणेला ५० वर्ष झाल्याच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय व्याघ्र परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. 

पंतप्रधानांची नुकतीच दावणगिरी येथे जाहीर सभा झाली. त्यात कर्नाटक येथे एप्रिल महिन्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत व्याघ्रगणनेचा अहवाल घोषित केला जाईल असेही संकेत त्यांनी दिले आहेत. त्यामुळे ९ एप्रिलला “व्याघ्रगणनेची आकडेवारी जाहीर होणार असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहेत. भारतातील वाघांची संख्या नेमकी किती याची उत्सुकता सर्वांनाच आहे. दर चार वर्षांनी व्याघ्रगणना होते. यंदा चंद्रपूर येथे २९ जुलैला व्याघ्रदिनाचा राष्ट्रीयस्तरावरील कार्यक्रम झाला. त्यात आकडेवारी जाहीर होईल असे बोलले जात होते. मात्र, काही राज्यांची आकडेवारी प्राप्त न झाल्याने तो मुहूर्त हुकला होता. आता प्रतिक्षा संपली आहे. याच परिषदेत वाघांचे ५० रुपयाचे नाणे देखील प्रसिद्ध केले जाणार आहे. जगभरातील व्याघ्रसंख्येच्या ७० टक्के वाघ भारतात आहेत. वाघांच्या संख्या वाढीचा दर हा वार्षिक सहा टक्के आहे. २००६ ते २०१८ या बारा वर्षांच्या कालावधीत भारताने व्याघ्रसंवर्धनावर पूर्णपणे लक्ष केंद्रित केल्यामुळे संख्या दुप्पट झाली. मध्य प्रदेश (५२६) आणि कर्नाटक (५२४) या राज्यात सर्वाधिक वाघ आहेत. दोन्ही राज्य वाघांच्या संवर्धनाच्या निमित्ताने स्पर्धक म्हणून पुढे येऊ लागले आहे.

भारतीय वाघ जाणार कंबोडियात ?

भारतातून कंबोडियामध्ये वाघांना नेण्याची योजना आहे. या आंतरराष्ट्रीय परिषदेत वाघाचे अस्तित्व असलेले भारतासह १३ देशाचे प्रतिनिधी सहभागी होत आहे. कंबोडियामध्ये २००९ मध्ये वाघ पूर्णपणे नामशेष झाले. भारत आणि कंबोडियामध्ये वाघाच्या स्थलांतरणाचा एक करार करण्यात आला आहे.

Friday, March 24, 2023

अर्थ अवर (Earth Hour) का साजरा केला जातो?


मुलांनो, तुम्हाला माहिती आहे का की विजेच्या बचतेची प्रेरणा देण्यासाठी जगभरात दिवसातून एक तास साजरा केला जातो? अर्थ अवर ही वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचरची मोहीम आहे. या मोहिमेचा उद्देश लोकांना विजेचे महत्त्व आणि पर्यावरण रक्षणाची जाणीव करून देणे हा आहे. 

मुलांनो, सिडनी, ऑस्ट्रेलिया येथे 2007 मध्ये (त्या वर्षी 31 मार्च) शेवटच्या शनिवारी अर्थ अवर  सुरू झाला. अर्थ अवर मोहिमेत, लोकांना 60 मिनिटांसाठी सर्व अनावश्यक दिवे बंद करण्याची विनंती करण्यात आली होती. हळूहळू तो जगभर साजरा केला जाऊ लागला.  2008 मध्ये 35 देशांनी अर्थ अवर सेलिब्रेशनमध्ये भाग घेतला होता. आता 180 हून अधिक देश 'अर्थ अवर' साजरा करण्याच्या मोहिमेत सामील झाले आहेत. 29 मार्च 2009 रोजी भारतात पहिल्यांदा अर्थ अवर साजरा करण्यात आला. अर्थ अवर दरवर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या शनिवारी साजरा केला जातो. यावेळी उद्या (25 मार्च) रात्री 8.30 ते 9.30 दरम्यान अर्थ अवर साजरा केला जाणार आहे. अनेक लोक मेणबत्त्या पेटवून अर्थ अवर साजरा करतात. 

मुलांनो, तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच येत असेल की आपण सर्वांनी या मोहिमेचा भाग का व्हायचे? बरं, फक्त एक तास वीज वाचवल्याने फारसा फरक पडणार नाही. परंतु दिवसातून एक तास केलेला प्रयत्न आणि लोकांची एकजूट यामुळे सर्वांना वीज बचतीची प्रेरणा मिळते आणि अधिकाधिक लोक पर्यावरणाबाबत जागरूक होतात. या जागतिक कार्यक्रमात दरवर्षी जगभरातील शेकडो देशांतील लाखो लोक सहभागी होतात. या दिवशी जगातील अनेक ऐतिहासिक वास्तूंचे दिवेही बंद केले जातात.  असे केल्याने प्रचंड ऊर्जा वाचते, जी अमूल्य आहे.

जगातील किती टक्के लोकांना शुद्ध पाणी मिळत नाही, असे संयुक्त राष्ट्रांनी केलेल्या 'जागतिक जल विकास अहवाल २०२३' मध्ये म्हटले आहे?


 प्रश्न 1 जगातील किती टक्के लोकांना शुद्ध पाणी मिळत नाही, असे संयुक्त राष्ट्रांनी केलेल्या 'जागतिक जल विकास अहवाल २०२३' मध्ये म्हटले आहे? 

उत्तर- जगातील २६ टक्के लोकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नाही, तर ४६ टक्के जनता शौचालयाच्या सुविधेपासून वंचित आहे, असे संयुक्त राष्ट्रांनी प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालात म्हटले आहे. पाणी या विषयावर संयुक्त राष्ट्रांमध्ये ४५ वर्षांमध्ये प्रथमच एका मोठ्या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. जगातील सर्व लोकांना २०३० पर्यंत स्वच्छ पाणी आणि मलनिस्सारणाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी संयुक्‍त राष्ट्रांनी काही उद्दोष्ट्ये निश्‍चित केली आहे, मात्र ती उद्दिष्टे आणि प्रत्यक्षातील स्थिती यांच्यातील प्रत्यक्ष अंतर असून प्रचंड काम करणे आवश्यक असल्याचे 'जागतिक जल विकास अहवाल २०२३'मध्ये म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रांनी निश्‍चित केलेली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी वर्षाला ६०० ते १००० अब्ज डॉलर इतक्या निधीची आवश्यकता असल्याचा अंदाज या अहवालाचे संपादक रिचर्ड कॉनर यांनी व्यक्‍त केला. ते मगणाले उद्दिष्टे साध्य करण्यासाठी निधी उभारण्याचे मोठे आव्हान आहे. त्यासाठी गुंतवणूकदार, वित्त संस्था, विविध देशांमधील सरकारे, पर्यावरणवादी संघटना यांच्याशी भागीदारी करून पैशांचा ओघ या कामाकडे वळविणे आवश्यक आहे." 

प्रश्न 2 कोणत्या भारतीय वंशाच्या अभिनेत्रीला अमेरिका सरकारतर्फे 'राष्ट्रीय मानवता पदक' देऊन सन्मान करण्यात आला?

 उत्तर-  अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी प्रतिष्ठेचे राष्ट्रीय मानवता पदक भारतीय वंशाच्या अभिनेत्री, पटकथालेखिका आणि दिग्दर्शिका मिंडी कलिग यांना प्रदान केले. त्यांच्याबरोबरच आणखी  काही जणांचाही असे पदक देऊन गौरव करण्यात आला. नव्या पिढीच्या कथाकथनकारांना बळ देण्याच्या मिंडी यांच्या कामाची दखल घेत त्यांना हे पदक प्रदान करण्यात आले असल्याचे 'व्हाइट हाउस'तर्फे सांगण्यात आले. कलाकार आणि कलेचे आश्रयदाते यांना अमेरिका सरकारतर्फे दिला जाणारा हा सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. आपल्या कलेत पारंगत होण्याबरोबरच इतरांसाठीही एक आदर्श निर्माण करणाऱ्या कलाकाराला तो दिला जातो. हा पुरस्कार मिळविणाऱ्या मिंडी या पहिल्या बिगर गौरवर्णिय कलाकार आहेत. आपली कथा अत्यंत प्रभावीपणे सांगण्यासाठी मिंडी यांनी नव्या पिढीला प्रेरणा दिली, असे गौरवोद्गार ज्यो बायडेन यांनी या वेळी काढले. 


प्रश्न 3 शाहरुख खान आणि सलमान खान 'पठाण' चित्रपटानंतर कोणत्या चित्रपटातून पुन्हा एकत्र येत आहेत?

उत्तर- सलमान खान आणि शाहरुख खान हे दोन महारथी  ‘टायगर 3'' मधून एकत्र येत आहेत. पुन्हा एकदा आपल्या  अभिनयाची छाप पाडून थक्क करायला लावणारे साहसी मनोरंजन करणार आहेत. 'टायगर 3’ हा वायआरएफ हेर विश्वातील कल्पनेवर आधारलेला सिनेमा असून 'एक था टायगर' आणि 'टायगर जिंदा है' यानंतरचा तिसरा सिनेमा आहे. 'टायगर ३'मधील सलमान -एसआरके दृश्याकरिता निर्माते भव्य सेटची निर्मिती करत आहेत आणि त्याकरिता ४५ दिवसांचा कालावधी लागणार आहे. सलमान खान आणि शाहरूख खान पुन्हा एकदा 'टायगर 3'करिता पडद्यावर दिसणार आहेत आणि सिनेमाच्या दृष्टीने हा एक भव्य आश्चर्यकारक पैलू असणार आहे. 'टायगर ३' मध्ये कतरिना कैफ झोयाच्या; तर इमरान हाश्मी खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असून हा सिनेमा दिवाळीत प्रदर्शनासाठी तयार असणार आहे. 

Thursday, March 23, 2023

जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा ...................... जिल्हाधिकाऱ्यांना मदत करतात.


प्रश्न 1. रिकाम्या जागा भरा.

1. प्रत्येक गावाचा स्थानिक कारभार .......... करते.

2.प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किमान ........ सभा होणे बंधनकारक आहे.

3. महाराष्ट्रात सध्या .............. जिल्हे आहेत. 

4. महाराष्ट्रात प्रथम महानगरपालिका स्थापन करण्यात आले, त्या शहराचे नाव ...........

5. शहर होण्याच्या प्रक्रियेत जी गावे असतात तेथे कामकाज पाहते .............

6. नगरपरिषदेच्या आर्थिक प्रशासनावर लक्ष ठेवतो .........

7. जिल्हा प्रशासनाचा प्रमुख ............ असतो. 

8. ............... तालुका दंडाधिकारी या नात्याने तंट्यामध्ये निवाडाही करतो.

9. जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा ...................... जिल्हाधिकाऱ्यांना मदत करतात. 

10. भारताच्या संविधानाने स्वतंत्र................ निर्मिती केली आहे.

11. जिल्हा पातळीवर असणाऱ्या न्यायालयाला ........... असे म्हणतात. 

12. आपत्तींच्या सुव्यवस्थित व शास्त्रीय पद्धतीने सामना करण्याच्या प्रक्रियेला ............................... असे म्हणतात.

उत्तर. 1. ग्रामपंचायत 2.सहा 3. 36 4. मुंबई 5. नगरपंचायत 6. नगराध्यक्ष 7.जिल्हाधिकारी 8. तहसीलदार 9. पोलीस प्रमुख 10. न्यायालय 11. जिल्हा न्यायालय 12. आपत्ती व्यवस्थापन 

Monday, March 20, 2023

ग्रिम ब्रदर्स : परीकथा लिहिणारे भाऊ


परीकथा कोणाला आवडत नाहीत. विशेषत: आपल्या लोककथांमध्ये परी आपल्याला अनेक रूपात दिसते.  लोककथा जपल्या नाहीत तर त्या कालांतराने नष्ट होतात. त्यामुळे लोककथांचे संकलन करून पुढील पिढ्यांसाठी जतन करून ठेवणे हे मोठे काम आहे. ग्रिम बंधूदेखील  अशाच कामात आयुष्यभर मग्न राहिले. ग्रिम ब्रदर्स म्हणून ओळखल्या जाणार्‍या भावांच्या जोडीत मोठा भाऊ जेकोबचा जन्म 4 जानेवारी 1785 रोजी झाला. तर धाकटा भाऊ विल्हेल्म ग्रिम यांचा जन्म 24 फेब्रुवारी 1786 रोजी झाला. दोघांचा जन्म जर्मनीतील होनाव शहरात झाला. नऊ भावंडांमध्ये ते दुसरे आणि तिसऱ्या स्थानी होते. त्यांच्या वडिलांनी त्यांची खूप काळजी घेतली.  मात्र वडिलांचे अकाली निधन झाले.

वडील वारले तेव्हा दोन्ही भाऊ दहा वर्षांचेही नव्हते. अशा स्थितीत त्यांनी गरिबीचे वाईट दिवसही पाहिले. कसेबसे कष्ट करून दोन्ही भावांनी कॉलेज गाठले. तेथे त्यांचे प्राध्यापक ज्युरीस्ट फ्रेडरिक यांनी त्यांना जर्मन साहित्य आणि तत्त्वज्ञानाकडे ओढले. या टप्प्यात त्यांचा कल जर्मन लोकसाहित्याकडे वाढला. सुरुवातीला दोन्ही भावांनीही नोकरी केली.  जाकोब घर चालवत असे. तो मोठ्या कष्टाने घर चालवत असे. अशा परिस्थितीत 1808 मध्ये जेकबला कॅसलमध्ये ग्रंथपाल म्हणून नोकरी मिळाली. त्याने आपल्या भावांना शिकवलं. पुढे विल्हेल्म हा त्याच्या मोठ्या भावासारखाच ग्रंथपाल झाला. तेव्हाच त्यांच्या मनात लोककथा गोळा करण्याचा विचार आला. 

लोकसाहित्य जाणून घेण्यासाठी त्यांनी संपूर्ण जर्मनीचा प्रवास केला. लोकांना भेटले, त्यांच्याकडून लोककथा ऐकल्या आणि त्या लिहून काढल्या. त्यांना पुस्तकाचं रूप दिलं.  मग काय! एकच खळबळ उडाली. 1812 मध्ये जर्मन भाषेत 'चिल्ड्रन अँड हाउसहोल्ड टेल्स' हे पहिले पुस्तक प्रकाशित झाले. तेव्हापासून 1857 पर्यंत सुमारे 40-45 वर्षांत त्यांच्या कथासंग्रहाच्या अनेक आवृत्त्या प्रकाशित झाल्या. विशेष म्हणजे, प्रत्येक आवृत्तीत कथा वाढत गेल्या आणि पहिल्या आवृत्तीतील 86 कथांची संख्या पुढे 200 पेक्षा जास्त झाली. 
कालांतराने त्यांनी गॉटिंगेन विद्यापीठात नोकरी स्वीकारली. जेकोब तेथे शिकवू लागला आणि विल्हेल्म ग्रंथपाल झाला. जर्मन भाषेला त्यांनी प्रथमच तिथे विषय म्हणून लागू केला.  पण त्यावेळी जर्मनीची स्थिती चांगली नव्हती. प्रजा आणि राजा यांच्यात मतभेद चालू होते. यामध्ये जेकोब राजाविरुद्ध उभा होता. यावर त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले तर गॉटिंगेनमधून हद्दपार करण्यात आले. ते दोघे पुन्हा कॅसलमध्ये परत आले.

आता त्यांनी जर्मन शब्दकोश तयार करण्याचे काम हाती घेतले. या दरम्यान, त्यांच्या मित्रांच्या प्रयत्नाने त्यांना बर्लिन विद्यापीठात नोकरी तर मिळालीच, शिवाय पुन्हा संशोधन करण्याची संधीही मिळाली. 1848 मध्ये जर्मन क्रांतीनंतर सत्तेत उलथापालथ झाली, दोन्ही भाऊ तिथल्या संसदेत निवडून गेले. यानंतर त्यांची अनेक पुस्तकेही प्रकाशित झाली आणि दोन्ही भावांनी मिळून पुन्हा जर्मन शब्दकोश तयार करण्याचे काम सुरू केले. मात्र त्यांच्या हयातीत ते पूर्ण झाले नाही. 1859 मध्ये विल्हेमचा मृत्यू झाला.  चार वर्षांनंतर १८६३ मध्ये जेकोबने हे जग सोडले. पण त्यांनी संकलित केलेल्या कथा 'सिंड्रेला' असोत, 'स्नो व्हाइट अँड सेव्हन ड्वार्फ्स' असोत किंवा 'फ्रॉग प्रिन्स' असोत, या कथांनी  प्रत्येक पिढीतल्या मुलांना वेड लावलं.- मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली 

Sunday, March 19, 2023

पळशी गावाचा भुईकोट किल्ला आणि विठ्ठल मंदिर


अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात असणाऱ्या पळशी या छोट्याशा गावातील गढीवजा भुईकोट किल्ला, होळकरांचे दिवाण राहिलेल्या पळशीकरांचा सुंदर लाकडी वाडा, ‘राही-रखुमाई’ नावाचे विठ्ठलाचे देखणे मंदिर पर्यटकांना आकर्षित करतात.  या गावात इतिहासाचा संपन्न वारसा वास्तूंमधून पाहावयास मिळतो. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पळशी गाव एका भुईकोट किल्ल्यात वसले आहे. त्यामुळे चहुबाजूंनी तटबंदीने वेढलेले  आहे. हे गाव होळकरांचे दिवाण रामजी यादव-कांबळे पळशीकर यांचे. त्यांच्या मुलाने म्हणजेच आनंदराव पळशीकर याने पानिपतच्या रणसंग्रामात मोठा पराक्रम गाजवला. त्यामुळे त्यांना हे गाव इनाम मिळालं. मग पळशीकरांनी येथे भुईकोट, वाडा आणि मंदिराची उभारणी केली. या भुईकोटामध्ये येण्यासाठी दोन दिशांना दोन भक्कम प्रवेशद्वारे आहेत. यातला मुख्य दरवाजा हा उत्तर दिशेला असून त्या दरवाजाला भक्कम असे दोन बुरूजदेखील दिसतात. याच प्रवेशद्वारावर दोन शिलालेख आहेत. 

शके १७०९ मध्ये पळशी या गावात या गढीच्या/किल्ल्याच्या बांधकामास सुरुवात झाली त्या वेळची मराठी तिथी या शिलालेखात दिलेली दिसते. तसेच १७१९ साली काम पूर्ण झाल्याचीही माहिती मिळते.  किल्ल्याचे बांधकाम रामराव अप्पाजी कांबळे – कुलकर्णी या जहागीरदारांनी केल्याचे समजून येते.  आतमध्ये बरीच घरे आहेत. मंदिरे, बाजारपेठ दुकानेही दिसतात. पण यात सर्वात जास्त लक्ष वेधून घेते ते महादेवाचे मंदिर. मंदिराचं हे वास्तुस्थापत्य मात्र आवर्जून पाहण्यासारखंच. संपूर्ण दगडात बांधलेल्या या मंदिराचा सभामंडप म्हणजे एक आश्चर्यच आहे. गोलाकार छत असलेल्या या मंडपात एकही खांब नाही. गाभाऱ्यात सुरेख शिविपडी आहे. मंदिराच्या भिंतीतील खिडक्याही आकर्षक मांडणीच्या आहेत. हे मंदिर बहुधा पेशवाईच्याच काळात बांधले गेले असावे. 

महादेव मंदिराच्या जवळच पळशीकरांचा देखणा वाडा आहे. लाकडात बांधला गेलेला हा वाडा म्हणजे काष्ठशिल्पाचा अद्भुत आणि उत्कृष्ट आविष्कारच आहे. हा वाडा तीन मजली आहे. वाडय़ाचे प्रवेशद्वार देखणे आहे. त्यानंतर पहारेकऱ्यांच्या देवडय़ाही दिसतात. या देवडय़ा पार करून डाव्या बाजूने आत गेलो की वाडय़ाचा मुख्य चौक लागतो. इथे  नाजूक नक्षीकाम पाहायला मिळतं. अननसाच्या पानासारखी खांबावर असणारी नक्षी, अंबारीसह हत्ती देवदेवतांच्या मूर्ती, यामधली फुलांची परडी असे विविध नक्षीकाम आहे.  वाडय़ाच्या वरच्या मजल्यावर जाण्यासाठी जिनेही आहेत. वाडय़ाच्या खालच्या मजल्यावरचे देवघरही पाहण्यासारखे आहे. जुन्या पद्धतीचे देवघर, त्याची मांडणी, छत आणि लाकडी सजावट दिसते. वाडय़ाचे मालक पळशीकर सध्या इंदूरला वास्तव्यास असल्याचे सांगतात. 

वाडा पाहून झाले की  राही रखुमाई मंदिर  पाहता येते. हे मंदिर मात्र भुईकोटाच्या बाहेर म्हणजेच दक्षिण दरवाजाच्या जवळच आहे. छोटय़ाशा ओढय़ाजवळील एका बंधाऱ्याजवळ हे मंदिर बांधलंय. त्यामुळे येथे बारमाही पाणी असते. मंदिराला सुरेख असे प्रवेशद्वार आणि त्यावर नगारखानाही दिसतो. तसेच मंदिराला चहुबाजूंनी तटबंदीसदृश बांधकामही दिसते. मंदिराची रचना सभामंडप आणि गाभारा अशी आहे. संपूर्ण दगडात घडवलेल्या या मंदिरांच्या भिंतीवर अनेक आकर्षक शिल्पे कोरलेली दिसतात. तसेच अनेक देवदेवतांच्या मूर्तीही येथे चितारल्या आहेत. सभामंडप हा १८ दगडी आणि नक्षीदार खांबांनी तोलून धरलेला दिसतो. हे खांब गोलाकार आणि सुंदर असून यावरचे नक्षीकामही पाहण्यासारखे आहे. गाभाऱ्यातील विठ्ठलाची मूर्ती काळ्या पाषाणात घडवलेली दिसते. ही मूर्ती कृष्णरूपातील विठ्ठलाची आहे असे अभ्यासकांचे मत आहे. कारण या मूर्तीच्या तळपट्टीवर गायीची शिल्पे कोरलेली दिसतात. तसेच विठुरायाच्या दोन्ही बाजूंना राही आणि रखुमाईच्या संगमरवरी मूर्ती बसवलेल्या दिसतात. पण या दोन्हीही मूर्ती विठ्ठलाच्या मूर्ती स्थापनेनंतरच्या कालावधीतील असाव्यात. मंदिराच्या बाहेर छोटीशी पुष्कर्णीही दिसते. या पुष्करणीत उतरण्यासाठी पायऱ्याही केलेल्या दिसतात. मंदिराच्या शेजारील बंधाऱ्याच्या पलीकडे राजघराण्यातील व्यक्तींच्या समाधी आणि मंदिरे आहेत. 

पारनेरपासून पळशीपर्यंत जायला चांगला डांबरी रास्ता आहे. पुणे-नाशिक महामार्गावरील आळेफाटा -बेल्हे- टाकळी ढोकेश्वर – खडकवाडी मार्गे किंवा पुणे नगर महामार्गावरून शिरुर- राळेगणसिद्धी -टाकळी ढोकेश्वर या मार्गेही पळशी गाव गाठता येते.


Saturday, March 18, 2023

चालू घडामोडी 1. 'ला पेरोस' या व्यायामाची तिसरी आवृत्ती कोणाकडून आयोजित केली जात आहे?

 चालू घडामोडी

 1. 'ला पेरोस' या व्यायामाची तिसरी आवृत्ती कोणाकडून आयोजित केली जात आहे?

 (a) भारत (b) USA (c) फ्रान्स (d) UK

2. भारताने संशोधन क्षेत्रात सहकार्यासाठी कोणत्या देशासोबत सहकार्य करारावर स्वाक्षरी केली आहे?

 (a) स्वीडन (b) स्वित्झर्लंड (c) नॉर्वे (d) पोर्तुगाल

3. G-20 फ्लॉवर फेस्टिव्हल कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला?

 (a) लखनौ (b) मुंबई (c) गुवाहाटी (d) नवी दिल्ली

4.  फेब्रुवारी महिन्यात आयसीसी महिला खेळाडूचा पुरस्कार जिंकणारी ऍशले गार्डनर कोणत्या देशाची आहे?

 (a) भारत (b) दक्षिण आफ्रिका (c) ऑस्ट्रेलिया (d) न्यूझीलंड

५.  शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) पर्यटन मंत्र्यांची बैठक भारतातील कोणत्या शहरात झाली?

 (a) वाराणसी (b) जयपूर (c) पाटणा (d) उज्जैन

उत्तर- 1 c 2 a 3 a 4 c 5 a

Friday, March 17, 2023

वयाच्या 60 व्या वर्षी लावला शोध! मुलीची जुनी सायकल सौरऊर्जेवर चालणाऱ्या 'ईव्ही'मध्ये बदलली


पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत, अशा परिस्थितीत इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणे हा प्रत्येकासाठी चांगला पर्याय बनला आहे. पण सामान्य माणसासाठी इलेक्ट्रिक वाहन विकत घेणे आव्हानात्मक आहे. त्याच्या उच्च किमतीपासून चार्जिंगपर्यंत अनेक समस्या असल्यामुळे अजूनही लोकांना EV वापरणं कठीण होऊन बसलं आहे. अशा परिस्थितीत पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यातील एका छोट्या गावात राहणाऱ्या 60 वर्षीय चंदन बिस्वास यांनी त्यांच्या कार्यालयात ये-जा करण्याच्या समस्येवर तोडगा शोधून काढला आहे. आणि त्यांनी त्यांच्या गावात बनवलेल्या सोलर सायकलमुळे ते  प्रसिद्धीलाही आले.

एका मुलाखतीत श्री. चंदन सांगतात की, “मी कुठेही सायकल घेऊन बाहेर जातो, तेव्हा लोक थांबवून विचारतात. फुकटात सहज चालवता येईल, अशी सायकल घ्यावी, असे गावातल्या अनेकांना वाटते.पण त्याच्या चढ्या किमतीमुळे प्रत्येकजण ते विकत घेऊ शकत नाही.” चंदन त्याच्या घरापासून ऑफिस आणि ऑफिस ते घर असा 24 किमीचा प्रवास स्वतःच्या सौर सायकलवरून करतात. चंदन यांचे ऑफिस त्यांच्या घरापासून 10 किमी अंतरावर करीमपूरमध्ये आहे. सुमारे तीन वर्षांपूर्वी चंदन घरापासून एक किमी दूर असलेल्या बसस्थानकावर जायचे आणि त्यानंतर तेथून बसने ऑफिसला जायचे. त्यांना नेहमी वाटायचं की, आपण एखादी स्कूटर खरेदी करावी, पण ते शक्य नव्हते. आर्थिक अडचणीमुळे आणि पेट्रोलच्या सातत्याने वाढणाऱ्या किंमती यांमुळे त्यांना शेवटी बसनेच ऑफिसला जाणं भाग होऊ लागलं. तीन वर्षांपूर्वी, जेव्हा सर्वजण इलेक्ट्रिक वाहनांबद्दल बोलू लागले तेव्हा चंदन यांना इलेक्ट्रिक वाहन वाहतुकीसाठी एक चांगला पर्याय आहे असं वाटू लागलं.  

आता कोठून मिळवायचे, कसे चार्ज करायचे?  असे अनेक प्रश्न त्याच्या मनात येऊ लागले. मग त्यांनी घरी काही प्रयोग करायला सुरुवात केली आणि आपल्या मुलीच्या जुन्या सायकलचे इलेक्ट्रिक सायकलमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतला. एक मोटार आणि लिथियम आयरन बॅटरीच्या सहाय्याने त्यांनी त्या सायकलचे इलेक्ट्रिक वाहनात रूपांतर केले. चार्ज केलेल्या बॅटरीच्या साहाय्याने ही सायकल सुरळीत धावू लागली. पण कधी कधी लांबचा प्रवास करावा लागल्यास बॅटरी चार्ज करणे अवघड होऊन जात असे. चंदन सांगतात की, “लांबच्या प्रवासात इलेक्ट्रिक सायकलचा चार्ज कधी कधी संपत असे.  त्यामुळे मला वाटलं की याला सोलर पॅनल का लावू नये!”  

मग चंदनने त्याच्या सायकलला 24/165W सोलर पॅनल बसवले. त्यांनी सोलर पॅनल पाच हजारांना आणि बॅटरी सुमारे नऊ हजारांना विकत घेतली. यासोबतच त्यांनी त्यात एक किटही ठेवले आहे. त्यांनी आपल्या सायकलला सोलर पॅनल अशा प्रकारे बसवले आहे की त्यामुळे प्रवासात सूर्यापासून त्यांचे संरक्षण करण्याचे कामही करते. या पॅनेलमुळे त्यांच्या सायकलचे रूपच पालटले आहे. जेव्हा ते पेडल न मारता लेडीज सायकल चालवतात तेव्हा लोक त्यांच्याकडे आणि त्यांच्या सायकलकडे बघतच राहतात.  ही सायकल बनवण्यासाठी तब्बल 19 हजारांचा खर्च आल्याचे चंदन सांगतात, तर बाजारात दुप्पट किमतीतही ही सायकल  उपलब्ध नाही.

खरे तर चंदन अत्यंत गरीब कुटुंबातील आहेत. त्यांचे वडील घरप्रपंच चालवण्यासाठी गावोगावी जाऊन कीर्तन करायचे. लहानपणापासूनच चंदन यांना विज्ञानात खूप आवड होती.  मात्र बारावीपर्यंत सायन्सचे शिक्षण घेतल्यानंतर आर्थिक अडचणीमुळे त्यांना कला शाखेतून पदवी घ्यावी लागली. मात्र, त्यांचं मन सतत काहीतरी बनवण्यात किंवा एखाद्या यंत्रांमध्ये मग्न असायचे. छंद म्हणून त्यांनी काही काळ रेडिओ आणि टीव्ही मेकॅनिक म्हणूनही काम केले. पण कॉपी रायटरची नोकरी मिळाल्यानंतर त्यांनी ते काम सोडले. 


चंदन सांगतात की, मला मशीन्समध्ये रुची आहे आणि मला अशा प्रकारची कामं करायला आवडतात. इलेक्ट्रिक सोलर सायकल बनवतानाही मी रोज ऑफिसमधून घरी आल्यावर काम करायचो. अशा प्रकारे मी दोन महिन्यांत सोलर सायकल तयार केली. चंदन अजून या एका शोधाने थांबणार नाहीत तर येणाऱ्या काळात हवेतील लहरींच्या व्होल्टेजचा वापर करून काहीतरी बनवण्याचा विचार करत आहे.चंदन यांनी आपल्या कौशल्याचा वापर करून आपले जीवन सुसह्य केले आहे ते खरे तर आश्चर्यकारक आहे, असे म्हणावे लागेल.- मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

ज्ञान शक्ती


1. भाक्रा हे भारतातील सर्वात उंच धरण कोणत्या नदीवर बांधले आहे?  (a) गंगा (b) सतलज (c) यमुना

2. नर्मदा नदीचा सर्वाधिक प्रवाह कोणत्या राज्यात वाहतो?  (a) उत्तर प्रदेश (b) आंध्र प्रदेश (c) मध्य प्रदेश

3. भारतात सागरी किनारपट्टी असलेल्या राज्यांची संख्या किती आहे?  (a) 9 राज्ये (b) 10 राज्ये (c) 8 राज्ये

4. भारतातील पहिली लोह पोलाद (आइरन स्टील ( कंपनी कोठे आहे?  (a) जमशेदपूर (b) दिल्ली (c) मुंबई

5. भारताचा पूर्वेकडील सागरी किनारा कोणत्या नावाने ओळखला जातो?  (a) दक्षिण किनारा (b) उत्तर किनारा (c) कोरोमंडल किनारा

उत्तर – 1. सतलज 2. मध्य प्रदेश 3. नऊ राज्ये 4. जमशेदपूर 5. कोरोमंडल किनारा

1. खालीलपैकी कोणता शब्द बरोबर आहे?  (अ) सन्यास (ब) संन्यास (स) सनयास

2. कोणत्या शहराला आपल्या देशाची आर्थिक राजधानी म्हटले जाते?  (A) कोलकाता (B) मुंबई (C) चेन्नई

3. तुम्ही सध्या पुण्यात असाल तर तुम्ही कोणत्या राज्यात आहात?  (a) गुजरात (b) महाराष्ट्र (c) आंध्र प्रदेश

4. हावडा ब्रिज (रवींद्र सेतू) पाहण्यासाठी तुम्हाला कोणत्या शहरात जावे लागेल?  (A) चेन्नई (B) कोलकाता (c) मुंबई

5. जर तुम्ही राष्ट्रपती भवनासमोर असाल तर तुम्ही कोणत्या राज्यात आहात?  (a) दिल्ली (b) लखनौ (c) ग्वाल्हेर

उत्तर- 1. संन्यास 2.मुंबई 3.महाराष्ट्र 4.कोलकाता 5.दिल्ली

Tuesday, March 14, 2023

आशियातील पहिल्या महिला लोको पायलट


मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी अशा दोन मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन चालवल्या जात आहेत. १0 फेब्रुवारी रोजी या दोन्ही गाड्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला होता. सोलापूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन चालवून; पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव यांनी मध्य रेल्वेच्या शिरपेचात महिला वंदे भारत एक्सप्रेस लोको पायलट म्हणून नाव कोरले. त्याबद्दल सुरेखा यादव यांचा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाट क्रमांक ८ वर सत्कार करण्यात आला.

यावेळी सुरेखा यादव म्हणाल्या की, नवीन काळातील, अत्याधुनिक तंत्रज्ञान वंदे भारत ट्रेनचे पायलट करण्याची संधी दिल्याबद्दल कृतज्ञ आहे. ट्रेन फरफेक्ट वेळी सोलापूर येथुन निघाली आणि वेळेच्या आत सीएसएमटीला पोहचली. यावेळी ट्रेन चालविणे शिकण्याच्या प्रक्रियेत विविध अनुभव आले. सुरेखा यादव या भारतातील पहिली महिला रेल्वे चालक बनल्या. त्या महाराष्ट्राच्या सातारा येथील आहेत. १९८८ मध्ये त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली. त्यांच्या उत्कृष्ट कायार्साठी त्यांना अनेक पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात आले.

जागतिक महिला दिनी मध्य रेल्वेवरील प्रतिष्ठित ट्रेन क्रमांक १२१२३ मुंबई पुणे डेक्कन क्वीन एक्स्प्रेस आशियातील पहिल्या महिला लोको-पायलट सुरेखा यादव यांच्या नेतृत्वाखाली व सहाय्यक लोको पायलट सायली सावर्डेकर यांच्यासोबत चालवण्यात आली.

लीना फ्रान्सिस यांनी गार्डची जबाबदारी पार पाडली. तसेच, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याणपर्यंत महिला विशेष उपनगरीय लोकल आशियातील पहिल्या उपनगरीय मोटरवुमन मुमताज काझी व महिला उपनगरीय गार्ड, मयुरी कांबळे यांच्या देखरेखीत चालविण्यात आली. आज महिला जगात कुठल्याही क्षेत्रात कमी नाही, हे परत एकदा आशियातील पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव यांनी दाखवुन दिले.

Monday, March 13, 2023

2023-24 सालातला महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प किती कोटी रुपयांचा महसूल तुटीचा आहे?

 1. 2023-24 सालातला महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प किती कोटी रुपयांचा महसूल तुटीचा आहे?


उत्तर- 16 हजार 122 कोटी रुपये महसुली तुटीचा अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्पीय अंदाज- महसूल जमा- 4,49, 522 कोटी रुपये, महसुली खर्च- 4,65,645 कोटी रुपये.
2.महाराष्ट्र राज्याच्या 2023- 24 अर्थसंकल्पात विभागनिहाय निधी कसा वाटण्यात आला आहे?
उत्तर-  (२०२३-१४)  विभागावर निधी वाटप- कृषी व संलग्न सेवा १३, १५८ कोटी , ग्रामीण विकास ७, २९५ कोटी,  विशेष क्षेत्र विकास ४२५ कोटी,  पाटबंधारे व पूरनियंत्रण १६,६९७ कोटी,  ऊर्जा १२ ४०५ कोटी ,  उद्योग व खाण १८५३ कोटी, परिवहन ३१,८२६ कोटी , सामाजिक व सामुहिक सेवा ६७,८५६ कोटी, सामान्य सेवा.१२३८२ कोटी
3. 2020-21 मध्ये  महाराष्ट्र राज्यात 15 हजार 225 हेक्टरवर आंबा बागा उभ्या राहिल्या. 2021- 22 मध्ये ही लागवड उच्चांकी म्हणजेच 20 हजार 822 हेक्टरवर नेली. यंदादेखील 2022-23 चालू वर्षात फेब्रुवारी अखेर आंबा लागवडीने19 हजार 100 हेक्टरचा टप्पा ओलांडला आहे.
4. केंद्र सरकारने यंदा 2023- 24 मध्ये देशात १३६ लाख टन हरभरा उत्पादनाचा अंदाज व्यक्‍त केला. मात्र वाढत्या तापमानामुळे उत्पादनात घट येत आहे. ठिकठिकाणी झालेला वादळी पाऊस आणि गारपिटीने हरभरा पिकाला फटका बसला. त्यामुळे उत्पादन यंदा १०० ते १०५ लाख टनांच्या दरम्यान राहू शकते, असा अंदाज आहे. सध्या 'नाफेड'कडे १६ लाख टनांच्या दरम्यान साठा आहे. याचा दबाव बाजारावर आहे. जागतिक हरभरा उत्पादन 2021 मध्ये 170 लाख टन झाले होते.
5. अमेरीकेच्या कृषी विभागाने अर्थात 'यूएसडीए' ने भारताचे कापूस उत्पादन 313 लाख गाठीपर्यंत कमी झाल्याचे स्पष्ट केले. यंदा अमेरिका, भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशमधील कापूस उत्पादन घटले, चीनमध्ये मात्र उत्पादन वाढल्याची नोंद आहे. यूएसडीएच्या मते, भारतात मागील हंगामात 312 लाख गाठी कापूस उत्पादन झाले होते. ते यंदा 313 लाख गाठींवर स्थिरावेल. कापूस निर्यात 19 लाख गाठींनी घटून 28 लाख गाठीपर्यंत कमी होईल.

Saturday, March 11, 2023

पेड पीरियड लीव्ह, अल्मा टेलिस्कोप आणि पंप आणि डंप स्कीम म्हणजे काय?


बहुतांश स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडीशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात.चालू घडामोडींशी संबंधित असेच शब्द जाणून घ्या जे चर्चेत राहतात आणि परीक्षेत विचारले जाऊ शकतात…

'पेड पीरियड लीव्ह' म्हणजे काय?

स्पेनने अलीकडेच महिलांसाठी सशुल्क कालावधीची रजा (पेड पीरियड लीव्ह) सुरू केली आहे. असे करणारा स्पेन हा युरोपमधील पहिला देश ठरला आहे. महिलांना कामाच्या ठिकाणी दर महिन्याला ३ ते ५ दिवसांची सुट्टी दिली जाईल, ज्याचा खर्च सरकार उचलणार आहे. यासाठी त्यांना डॉक्टरांनी दिलेला फॉर्म दाखवावा लागेल. याशिवाय महिलांना स्वच्छता उत्पादने दिली जातील, जी देशभरातील शैक्षणिक आणि सामाजिक केंद्रांवर उपलब्ध असतील.

अल्मा टेलिस्कोप म्हणजे काय?

 अल्मा टेलिस्कोप सध्या चर्चेत आहे. ही एक रेडिओ दुर्बिणी आहे ज्यामध्ये 66 अँटेना आहेत. लवकरच त्याचे सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर अपग्रेड केले जातील. यानंतर अंतराळातील घडामोडींचे अधिक चांगले आणि उच्च रिझोल्यूशन चित्रे काढता येतील. त्याची सुरुवात 2013 मध्ये झाली. हे चिली, यूएसए मध्ये स्थित आहे.  अमेरिकेसह जगातील 16 देशांनी यासाठी निधी दिला आहे.  यामध्ये युरोप, कॅनडा, जपान, तैवानसह अनेक देशांचा समावेश आहे. 

पंप आणि डंप स्कीम काय आहे?

 पंप और डंप स्कीममध्ये अभिनेता अर्शद वारसी आणि त्याच्या पत्नीसह अनेकांना दोषी ठरवण्यात आले आहे.शेअर मार्केटमध्ये फेरफार करण्याचा हा एक मार्ग आहे.  ज्या अंतर्गत क्रिप्टोकरन्सी किंवा कोणत्याही स्टॉकबद्दल अफवा पसरवल्या जातात. जसं की शिखरावर पोहोचताच त्याची किंमत कमी होते.  परिणामी गुंतवणुकदार खोट्या प्रचारात अडकून शेअर्स खरेदी करू लागतात आणि नुकसान सोसावे लागते.


पेट्रोलचे दर वाढले तेव्हा 'भंगारा'तून बनवली 6 सीटर इलेक्ट्रिक सायकल


पेट्रोलच्या वारंवार वाढणाऱ्या किमतींमुळे आझमगडच्या असद अब्दुल्ला याला अशी सायकल बनवण्याची प्रेरणा मिळाली, की ज्यावर 6 लोक बसून प्रवास करू शकतील. ही इलेक्ट्रिक सायकल विजेवर चालते. 19 वर्षीय असद हा शेतकरी कुटुंबातला आहे. तो सांगतो, त्याला अनेक कामांसाठी बाईकची गरज होती, पण पेट्रोलच्या वाढत्या किमतींमुळे ती विकत घेणं अवघड होतं, म्हणून त्याने इलेक्ट्रिक सायकल बनवली.आता त्याने बनवलेल्या सायकलवर  6 लोक एकत्र बसून प्रवास करू शकतात. असद आयटीआयमधून डिप्लोमा करत असून त्याला मेकॅनिकल कामात जास्त रस आहे. त्याला भंगार आणि मशीन्समध्ये जुगाड करायला आवडते, त्यातूनच त्याने अशी सायकल तयार केली.

असद सांगतो की, लहानपणी तो रिमोटच्या साह्याने कारसोबत खेळायचा, त्यामुळे अशा यांत्रिक कामाकडे त्याचे अधिक लक्ष वाढले.  सध्या तो जुगाडमधून अनेक गोष्टी बनवतो आणि त्याचे व्हिडिओ बनवून त्याच्या यूट्यूब चॅनलवर तो रिलीज करतो. तो म्हणतो की मी जे काही शोध लावतो किंवा बनवतो, ते गावातील लोकांसाठी असतात.  मी ही बाईक फक्त गावकऱ्यांसाठी बनवली होती. आता तो सौरऊर्जा आणि बॅटरीवर चालणारे विमान बनवण्याच्या तयारीत आहे.
तो म्हणतो, सगळ्यांना माहीत आहे की दोन आणि तीन सीटर बाइक्स आधीच बाजारात आहेत. म्हणूनच मी विचार केला की 6 सीटर सायकल का बनवू नये. गावकऱ्यांना याचा अधिक फायदा होणार आहे. सायकल बनवण्यासाठी भंगारातून अनेक वस्तू गोळा केल्या गेल्या आणि 12 हजार रुपये खर्चून सायकल तयार झाली. ती बॅटरीवर चालते. ती एकदा चार्ज केल्यावर 150 किलोमीटर प्रवास करू शकते.

Friday, March 10, 2023

कोणता पदार्थ पूर्णान्न म्हणून ओळखला जातो ?


प्रश्न 1 कोणता पदार्थ पूर्णान्न म्हणून ओळखला जातो ? उत्तर- दूध 

प्रश्न 2 हाडांच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते? 

उत्तर- ड जीवनसत्व 

प्रश्न 3 सूर्याकडून पृथ्वीवर येणारी किती अतिनिळ किरणे ओझोनच्या थरामुळे अडविली जातात? 

उत्तर- ९९ टक्के 

प्रश्न 4 पाण्याचा गोठणबिंदू किती असतो? 

उत्तर- ० अंश सेल्सअस 

प्रश्न 5 'पेनिसिलीन' पदार्थाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? 

उत्तर- फ्लेमिंग 

प्रश्न 6 काकडी किंवा टरबूज फळभाज्यांमध्ये पाण्याचे प्रमाण किती असते? 

उत्तर- ९२ टवके 

प्रश्न 7 कोणत्या रोगाचा प्रसार पाण्यामार्फत होतो? उत्तर- अतिसार, कावीळ विषमज्वर 

प्रश्न 8 वातावरणातील तापमान कोणत्या वायूमुळे वाढते? 

उत्तर- कार्बन डायऑक्साईड 

प्रश्न 9 रक्ताक्षय  (Anemia) कशाच्या कमतरतेमुळे होतो? 

उत्तर- लोह 

प्रश्न 10  रसायनाचा राजा म्हणून कोणाला संबोधतात? 

उत्तर- सल्फ्युरिक असिड 

प्रश्न 11 पाणी शुद्धीकरणासाठी खालीलपैकी काय वापरण्यात येते? 

उत्तर-  क्लोरीन 

प्रश्न 12 विषाणूंचा अभ्यास कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखला जातो ? 

उत्तर-  व्हायरॉलॉजी 

प्रश्न 13 भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो रेल्वे कोणत्या शहरामध्ये सुरु झाली? 

उत्तर- कोलकाता 

प्रश्न 14 बीसीजी लस कोणत्या रोगापासून बचाव करते? 

उत्तर- क्षयरोग 

प्रश्न 15 कोणत्या धातूचा उपयोग टिकाऊ चुंबक तयार करण्यासाठी करण्यात येतो? 

उत्तर- पोलाद 

प्रश्न 16 वातावरणात कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण किती टक्के आहे ? 

उत्तर-  0.04 ट्क्के 

प्रश्न 17 कोणतीही वस्तू हलवण्यासाठी लागणारे बल हे वस्तूच्या कशावर अबलंबून असते? 

उत्तर- वस्तुमान

प्रश्न 18  खाद्यपदार्थात खाण्याच्या सोड्याचा सर्वाधिक वापर केल्यास कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो? 

उत्तर- क जीवनसत्व 

प्रश्न 19 निद्रानाश रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे मनुष्यात आढळतो? 

उत्तर- ब जीवनसत्व 

अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळविणारे भारतातील पहिले शास्त्रज्ञ?


प्रश्न 1 अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळविणारे भारतातील पहिले शास्त्रज्ञ?

उत्तर- डॉ. अमर्त्य सेन
प्रश्न 2 पहिल्या भारतीय पाणबुडीचे नाव?
उत्तर- आयएसएस कावेरी
प्रश्न 3 परमवीर चक्र मिळविणाऱ्या पहिल्या व्यक्तीचे नाव?
उत्तर- मेजर सोमनाथ शर्मा
प्रश्न 4 अंतराळात जाणारा पहिला भारतीय?
उत्तर- राकेश शर्मा
प्रश्न 5  भारतरत्न पुरस्कार मिळविणाऱ्या पहिल्या भारतीयाचे नाव?
उत्तर- डॉ. एस राधाकृष्णन
प्रश्न 6 लोकसभेच्या पहिल्या सभापतीचे नाव?
उत्तर- जी. व्ही. मावळणकर 1952-1957
प्रश्न 7 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अध्यक्षाचे नाव?
उत्तर- डब्ल्यू. सी. बॅनर्जी
प्रश्न 8 भारताचे पहिले राष्ट्रपती?
उत्तर.  डॉ. राजेंद्र प्रसाद
प्रश्न 9 ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणाऱ्या पहिल्या भारतीयाचे नाव?
उत्तर- जी. शंकर कुरूप
प्रश्न 10 भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती ?
उत्तर- श्रीमती प्रतिभा पाटील
प्रश्न 11 भारतरत्न मिळविणाऱ्या भारतातील पहिल्या महिला संगीतकाराचे नाव?
उत्तर- एम. एस. सुब्बुलक्ष्मी
प्रश्न 12 भारतात सर्वात मोठ्या क्षेत्रात कोणते पीक घेतले जाते?
उत्तर- तांदूळ
प्रश्न 13  कोणत्या व्यक्तिमत्त्वाने 'आनुवंशिकतेचे नियम’ दिले?
उत्तर- जी. जे. मेंडल
प्रश्न 14 गरमपाणी अभयारण्य कोठे आहे?
उत्तर- दिफू आसाम
प्रश्न 15  'गटरचा संत' म्हणून कोणाला ओळखले जाते?
उत्तर- मदर तेरेसा
प्रश्न 16 देशबंधू म्हणूनही कुणाला ओळखले जाते? उत्तर- चित्तरंजन दास
प्रश्न 17 FFC चे पूर्णस्वरूप काय आहे? : फिल्म फायनान्स कॉर्पोरेशन
प्रश्न 18 उत्तराखंडची राजधानी कोणती?
उत्तर- देहरादून
प्रश्न 19 क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते?
उत्तर- राजस्थान
प्रश्न 20  जागतिक व्यापार संघटना कधी अस्तित्वात आली?
उत्तर- 1995
प्रश्न 21 १९९३ मध्ये संयुक्त राष्ट्रांचे १८२ वे सदस्य बनले एरिट्रिया कुण्या खंडात आहे?
उत्तर- आफ्रिका
प्रश्न 22 गीत गोविंद ही एक प्रसिद्ध निर्मिती कोणाची आहे?
उत्तर- जयदेव
प्रश्न 23 मराठा आणि केसरी ही दोन मुख्य वृत्तपत्रे कोणी सुरू केली होती?
उत्तर- बाळ गंगाधर टिळक


Thursday, March 9, 2023

भारताचे राष्ट्रीय फळ कोणते?


प्रश्न 1 भारतीय शासन प्रणाली कोणत्या प्रकारची आहे? 

उत्तर- लोकशाही 

प्रश्न 2 भारताचा घटनात्मक प्रमुख कोण आहे?  उत्तर-राष्ट्रपती 

प्रश्न 3 लोकसभेच्या सर्वात जास्त जागा कोणत्या राज्याला आहेत? 

उत्तर- उत्तर प्रदेश 

प्रश्न 4 ‘वन’ विषय कोणत्या सूचीतील आहे?

उत्तर- समवर्ती 

प्रश्न 5 जगातील सर्वात मोठा धर्म कोणता? 

उत्तर- ख्रिश्चन

प्रश्न 6 भारताचे ब्रीदवाक्य/ ध्येयवाक्य कोणते?

 उत्तर- सत्यमेव जयते 

प्रश्न 7 आपले राष्ट्रीय सण कोणते? 

उत्तर- स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन 

प्रश्न 8 आपली राष्ट्रीय प्रतिके कोणती? 

 राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, राजमुद्रा 

प्रश्न 9 राजमुद्रेतील सिंह कशाचे प्रतीक आहे? 

उत्तर-  सामर्थ्य 

प्रश्न 10 भारताची राजमुद्रा कुठून घेतली? 

उत्तर-  सारनाथ अशोकस्तंभ 

प्रश्न 11 भारताचे ध्वजगीत कोणते? 

उत्तर-  विजयी विश्‍व तिरंगा प्यारा 

प्रश्न 12 भारत देश कोणत्या खंडात आहे? 

उत्तर- आशिया 

प्रश्न 13 भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले? 

उत्तर- १५ ऑगस्ट १९४७ 

प्रश्न 14  भारताचे राष्ट्रगीत कोणते आहे? 

उत्तर- जन गण मन 

प्रश्न 15 भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? 

उत्तर- डॉ. राजेंद्र प्रसाद 

प्रश्न 16  भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? 

उत्तर- वाघ 

प्रश्न 17  भारताचे राष्ट्रीय फुल कोणते? 

उत्तर- कमळ 

प्रश्न 18  भारताचे राष्ट्रीय फळ कोणते? 

उत्तर- आंबा 

प्रश्न 19  भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी ? 

उत्तर- डॉल्फिन 

प्रश्न 20 कोणत्या प्राण्याला भारतीय सरकारने 'राष्ट्रीय वारसा' हा दर्जा दिला आहे? 

उत्तर- हत्ती 

प्रश्न 21 भारताची राष्ट्रीय भाजी कोणती आहे? 

उत्तर- भोपळा 

प्रश्न 22  कोणत्या नदीला भारत सरकारने राष्ट्रीय नदी घोषित केळे आहे? 

उत्तर- गंगा 

Wednesday, March 8, 2023

पहिली भारतीय विश्वसुंदरी कोण?


 प्रश्न 1 भारताच्या राष्ट्रध्वजात एकूण किती रंग आहेत? उत्तर. तीन. केशरी, पांढरा, हिरवा, 

प्रश्न 2  राष्ट्रध्वजावरील केशरी रंग कशाचे प्रतीक आहे? 

उत्तर- त्याग, शोर्य 

प्रश्न 3  राष्ट्रध्वजावरील पांढऱ्या रंगातून कोणता संदेश मिळतो? 

उत्तर- शांततेचा 

प्रश्न 4  राष्ट्रध्वजावरील हिरवा रंग कशाचे प्रतीक आहे? उत्तर-  समृद्धीचे 

प्रश्न 5 भारताची राज्यघटना कधी अंमलात आली?  उत्तर- १९५० 

प्रश्न 6  भारताचे राष्ट्रीय चलन कोणते? 

उत्तर- रुपया 

प्रश्न 7 भारतातील प्रमुख व्यवसाय कोणता? 

उत्तर- शेती 

प्रश्न 8 भारतात किती भाषांना अधिकृत मान्यता आहे? उत्तर- २२ 

प्रश्न 9  स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर कोण? 

उत्तर- लॉर्ड माउंटबॅटन 

प्रश्न 10  नोबेल पुरस्काराचे पहिले भारतीय मानकरी कोण?

उत्तर-  रवींद्रनाथ टागोर 

प्रश्न 11 भारताची राष्ट्रलिपी कोणती? 

उत्तर-  देवनागरी 

प्रश्न 12 भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण? 

उत्तर- डॉ. बाबासाहेब आंबेडकर 

प्रश्न 13 भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष कोण? 

 डॉ. राजेंद्रप्रसाद

प्रश्न 14 भारताचे राष्ट्रहित कोणते? 

उत्तर-  अहिंसा 

प्रश्न 15  लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा कितवा क्रमांक लागतो? 

उत्तर-  दुसरा 

प्रश्न 16 भारतीय शास्त्रीय संगीताच्या दोन प्रमुख पद्धती कोणत्या ? 

प्रश्न 17  हिंदुस्थानी संगीत, कर्नाटकी संगीत 

प्रश्न 18 भारताचे प्रवेशद्वार कोणते? 

उत्तर-  गेट वे ऑफ इंडिया 

प्रश्न 19 राष्ट्रध्वज चढवताना व उतरवताना कोणत्या स्थितीत  उभे राहावे ? 

उत्तर-  सावधान स्थितीत 

20 भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले? 

उत्तर- १५ ऑगस्ट १९४७ 

प्रश्न 21 भारतातील पहिले अंतराळवीर कोण? 

उत्तर- राकेश शर्मा 

प्रश्न 22 अवकाशयात्री पहिली महिला कोण? 

उत्तर- कल्पना  चावला 

प्रश्न 23  पहिली भारतीय विश्वसुंदरी कोण? 

उत्तर-  ऐश्वर्या रॉय 

भारतामध्ये हिऱ्याची खाण कुठे आहे?


 प्रश्न 1. महात्मा गांधी यांचा जन्म कधी झाला? 

उत्तर-२ ऑक्टोबर १८६९ रोजी 

प्रश्न 2. विजेचा शोध कोणी लावला? 

उत्तर- बेंजामिन फ्रँकलिन 

प्रश्न3. जागतिक आश्‍चर्यापैकी कोणते आश्‍चर्य भारतामध्ये आहे? 

उत्तर- ताजमहाल

प्रश्न 4- भारतातील कोणते राज्य मसाला उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? 

उत्तर- केरळ 

प्रश्न 5- भगतसिंग यांना कोणत्या दिवशी फाशी देण्यात आली? 

उत्तर-  २३ मार्च १९३१ 

प्रश्न 6- भारतातील सर्वात मोठी नदी कोणती?

उत्तर- गंगा 

प्रश्न 7- भारतामध्ये हिऱ्याची खाण कुठे आहे? 

उत्तर- आंध्र प्रदेश आणि छत्तीसगड 

प्रश्न 8-  भारतातील पहिली महिला डॉक्टर कोण? 

उत्तर-  आनंदी गोपाळ जोशी 

प्रश्न 9- आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली?  उत्तर- नेताजी सुभाषचंद्र बोस 

प्रश्न 10- भारतातील सर्वाधिक साक्षरता असलेले राज्य कोणते? 

उत्तर- केरळ 

प्रश्न 11- भारताची राज्यघटना घटना समितीने कोणत्या साली स्वीकारली? 

उत्तर-  २६ नोव्हेंबर १९४९ 

प्रश्न 12- राजमुद्रेतील सिंहाच्या चित्राखाली काय लिहिले आहे? 

उत्तर- सत्यमेव जयते 

प्रश्न 13-  राष्ट्रध्वज केव्हा उतरवावा? 

उत्तर- सूर्यास्ताच्या वेळी 

प्रसगण 14- २६ जानेवारीच्या संचलनाची मानवंदना कोण स्वीकारतात? 

उत्तर-  राष्ट्रपती 

प्रश्न 15-  भारताची राजधानी कोणती? 

उत्तर- दिल्ली 

प्रश्न 16-  भारतात एकूण किती राज्ये आहेत? 

उत्तर-२८ 

प्रश्न 17- भारतामध्ये किती केंद्रशासित प्रदेश आहेत? 

 उत्तर- आठ 

प्रश्न 18- भारतातील कोणत्या शहराची लोकसंख्या सर्वाधिक आहे? 

उत्तर-  मुंबई 

प्रश्न 19- भारतामध्ये क्षेत्रफळाने सर्वांत मोठे राज्य कोणते? 

उत्तर- राजस्थान 

प्रश्न 20- भारतातील कोणते राज्य क्षेत्रफळाने सर्वांत लहान आहे? 

उत्तर- गोवा 

प्रश्न 21- भारतामध्ये किती राष्ट्रीय उद्याने आहेत? 

उत्तर- १०३ 

प्रश्न 22- भारतात किती वन्यजीव अभयारण्ये आहेत?  उत्तर- ५६५ 

प्रश्न 23- भारतचे क्षेत्रफळ किती? 

उत्तर- ३२,८७,२६३ चौ.किमी 

प्रश्न 24- भारताचे राष्ट्रपिता म्हणून कोणाला संबोधले जाते? 

उत्तर- महात्मा गांधी 

प्रश्न 25- आपले राष्ट्रगीत किती वेळात पूर्ण करावे?  उत्तर- ५२ सेकंद 

प्रश्न 26- टेलिफोनचा शोध कोणी लावला ? 

उत्तर-अलेक्झांडर ग्रॅहम बेल 

प्रश्न 27-  जगातील सर्वात उंच प्राणी कोणता? 

उत्तर- जिराफ 

प्रश्न 28-  वाळवंटातील जहाज म्हणून कोणत्या प्राण्याला ओळखले जाते? 

उत्तर- उंट 

प्रश्न 29- जगातील सर्वात उंच पर्वत कोणता? 

उत्तर- माउंट एव्हरेस्ट 

Tuesday, March 7, 2023

केंद्र सरकारने महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या सीमाप्रश्नासाठी मार्च 2023 मध्ये दोन्ही राज्यांतून सहा जणांची समिती स्थापन केली आहे. त्यातील सदस्यांची नावे सांगा.


1. केंद्र सरकारने महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या सीमाप्रश्नासाठी मार्च 2023 मध्ये दोन्ही राज्यांतून सहा जणांची समिती स्थापन केली आहे. त्यातील सदस्यांची नावे सांगा.

उत्तर- महाराष्ट्रातून चंद्रकांत पाटील, शंभूराजे देसाई, दीपक केसरकर आणि कर्नाटक राज्यातून मंत्री गोविंद कारजोळ, शशिकला जोल्ले आणि माधुस्वामी यांचा समावेश आहे. 

2. कोणत्या चित्रपटांना राज्य शासन जास्तीचे एक कोटींचे अनुदान देणार असल्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानपरिषदेत दिली?

उत्तर- छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील किंवा अन्य विषयांवरील प्रेरणादायी चित्रपटांसाठी तसेच राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कारांसाठी नामांकन केल्या जाणाऱ्या चित्रपटांसाठी दुप्पट अनुदान दिले जाणार आहे.  अनुदानासाठी 2021 मध्ये 178 चित्रपट आले मात्र त्यापैकी एकाही चित्रपटाचे परीक्षण झाले नाही. पर्यायाने अनुदानासाठी एकही चित्रपट पात्र ठरला नाही. 2022 मध्ये 214 चित्रपट परीक्षणासाठी समितीकडे पडून आहेत. 

3. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कोण आहेत?

उत्तर- नरेंद्र पाटील 

4. देशात नुकत्याच संपलेल्या फेब्रुवारी 2023 महिन्यामध्ये वस्तू आणि सेवा कर ( जीएसटी) संकलन किती कोटी रुपयांवर पोहोचले आहे?

उत्तर- 1,49,577 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये भारताचा जीएसटी महसूल 1,33,026 कोटी रुपये होता. 

5. इंटरनेट शटडाऊन करण्याप्रकरणी भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे?

उत्तर- भारत सलग पाचव्या वर्षी पहिल्या क्रमांकावर आहे. 2022 मध्ये जगात एकूण 187 वेळा इंटरनेट वर बंदी घालण्यात आली. यातील 84 वेळा ही बंदी भारतात लागू करण्यात आली. जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये वर्षभरात 48 वेळा इंटरनेट बंदी घालण्यात आली होती. हा अहवाल न्यूयॉर्क मधील डिजिटल राइट्स अडव्होकेसी ग्रुप ऍक्सेस नाउने जारी केला आहे. 

6. नुकताच महाराष्ट्र साहित्य परिषदेला कोणता राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे?

उत्तर- आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ भाषा वैज्ञानिक आणि साहित्य समीक्षक डॉ. अशोक रा. केळकर यांच्या नावाने देण्यात येणारा मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार 2022 (संस्था) महाराष्ट्र राज्य साहित्य परिषदेला मिळाला आहे. 

7.हिमाचल प्रदेशातील कर्मचाऱ्यांना कोणत्या महिन्यापासून जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात होणार आहे?

उत्तर- 1 एप्रिल 2023 पासून. यामुळे सरकारी तिजोरीवर वर्षाला 1000 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. 

8. हिमाचल प्रदेश चे मुख्यमंत्री कोण आहेत?

उत्तर- सुखविंदर सुक्खू 

9. इतिहासकार डॉ. बाळ कृष्ण यांच्या 'शिवाजी द ग्रेट' या शिवचरित्राचा मराठी अनुवाद कोणी केला आहे?

उत्तर- वसंत आपटे. राजश्री शिरोडकर. ( या ग्रंथाचे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे चार खंड प्रसिद्ध झाले आहेत.) पंजाबमध्ये जन्मलेले परंतु कोल्हापूर, महाराष्ट्र आणि शिवरायांशी एकरूप झालेले, शाहू महाराजांनी राजाराम कॉलेजचे प्राचार्य म्हणून निवडलेले असे हे डॉ. बाळ कृष्ण त्यांनी 1930 ते 1940 ही दहांवर्षे परिश्रम घेऊन  इंप्रजीमध्ये शिवचरित्र लिहिले होते. परंतु, मराठी वाचक या इंग्रजीतील चरित्राकडे वळला नाही. त्यामुळे ते  उपेक्षित राहिले. त्याचा लाभ 'मंराठी वाचकांना व्हावा, शिवरायांचे व्यापक राजकारण समजावे  यासाठी डॉ. जयसिंगराव पवार यांच्या संपादकत्वाखाली सांगली येथील पत्रकार वसंत आपटे यांनी या शिवचरित्राचा अनुवाद  केला आहे. 

10. डॉ.अभिजीत सोनवणे कोण आहेत?

उत्तर- पुण्यातील भिक्षेकरी लोकांचे डॉक्टर आहेत. पाच लाख रुपयांची नोकरी सोडून ते भिक्षेकऱ्यांची अहोरात्र सेवा करतात. 

11. अपघात होऊ नये म्हणून महामार्गाच्या कडेला लावण्यात येणार्‍या धातूच्या कठड्यांऐबजी बांबूचे क्रॅश बॅरिअर लावण्याचा जगातील पहिला प्रयोग  कोठे करण्यात आला आहे?

उत्तर- महाराष्ट्रातील विदर्भात 22 मीटर लांबीचे हे बॅरिअर  वणी ते वरोरा महामार्गावर लावण्यात आले आहे. 

12. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे संचालक सचिन धर्माधिकारी यांना कोणत्या विद्यापीठाने डी. लिट. पदवी देऊन गौरवले आहे?

उत्तर- राजस्थान येथील जगदिशप्रसाद झाबरमल टीबरेवाल विद्यापीठ.

12. 'अहमदनगर येथील 'स्नेहालय' या संस्थेच्या कार्याचे चित्रण करणारे कोणते पुस्तक अलीकडेच प्रकाशित करण्यात आले आहे?

उत्तर- मेधा भास्करन यांनी लिहिलेल्या 'अप अंगेंस्ट डार्कनेस' या पुस्तकात 'स्नेहालय' या संस्थेमार्फत गिरीश कुलकर्णी यांनी जे सामाजिक कार्य उभे केले आहे,त्याचे चित्रण करण्यात आले आहे. हे पुस्तक इंग्रजीत आहे. 

13. कोणते गीत महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकारण्यात आले आहे? त्याचे कवी कोण?

उत्तर- कविवर्य राजा नीलकंठ बढे यांच्या ' जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ' हे गीत राज्यगीत म्हणून स्वीकारण्यात आले आहे. या गीतातील दोन चरण स्वीकारले आहेत. 19 फेब्रुवारी2023 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून हा निर्णय घेण्यात आला.

14. महाराष्ट्र शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या 'महाराष्ट्र भूषण' या पुरस्कारासाठी आता किती रक्कम ठेवण्यात आली आहे?

उत्तर- दहा लाखांवरून आता पंचवीस लाख रुपये करण्यात आले आहेत.

Friday, March 3, 2023

चालू घडामोडी

चालू घडामोडी

1. अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी कोणाला नामनिर्देशित केले आहे?
(A) सौम्या स्वामीनाथन (B) अजय बंगा (C) गीता गोपीनाथ (D) नील मोहन
2. प्रसिद्ध नृत्यांगना कनक रेळे यांचे नुकतेच निधन झाले, त्या कोणत्या शास्त्रीय नृत्यातील प्रसिद्ध नृत्यांगना होत्या?
(A) भरतनाट्यम (B) ​​कथ्थक (C) मोहिनीअट्टम
(D) कथकली

3. डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव पाहता कोणत्या देशाने आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे?
(A) पेरू (B) ब्राझील (C) मेक्सिको (D) पाकिस्तान

4. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती एस.  अब्दुल नजीर यांनी कोणत्या राज्याचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली?
(A) आंध्र प्रदेश (B) केरळ (C) हिमाचल प्रदेश (D) बिहार

उत्तर- 1.B 2.C 3.A 4.A

शेतकऱ्यांचा खास मित्र: खोकड

खोकड हा एक लहान आकाराचा सस्तन प्राणी आहे.हा मांसाहारी गणाच्या कॅनिडी कुलातील आहे. या कुलात कुत्रा, लांडगा, कोल्हा, वन्य कुत्रा, इ. प्राणी ये...