Saturday, March 11, 2023

पेट्रोलचे दर वाढले तेव्हा 'भंगारा'तून बनवली 6 सीटर इलेक्ट्रिक सायकल


पेट्रोलच्या वारंवार वाढणाऱ्या किमतींमुळे आझमगडच्या असद अब्दुल्ला याला अशी सायकल बनवण्याची प्रेरणा मिळाली, की ज्यावर 6 लोक बसून प्रवास करू शकतील. ही इलेक्ट्रिक सायकल विजेवर चालते. 19 वर्षीय असद हा शेतकरी कुटुंबातला आहे. तो सांगतो, त्याला अनेक कामांसाठी बाईकची गरज होती, पण पेट्रोलच्या वाढत्या किमतींमुळे ती विकत घेणं अवघड होतं, म्हणून त्याने इलेक्ट्रिक सायकल बनवली.आता त्याने बनवलेल्या सायकलवर  6 लोक एकत्र बसून प्रवास करू शकतात. असद आयटीआयमधून डिप्लोमा करत असून त्याला मेकॅनिकल कामात जास्त रस आहे. त्याला भंगार आणि मशीन्समध्ये जुगाड करायला आवडते, त्यातूनच त्याने अशी सायकल तयार केली.

असद सांगतो की, लहानपणी तो रिमोटच्या साह्याने कारसोबत खेळायचा, त्यामुळे अशा यांत्रिक कामाकडे त्याचे अधिक लक्ष वाढले.  सध्या तो जुगाडमधून अनेक गोष्टी बनवतो आणि त्याचे व्हिडिओ बनवून त्याच्या यूट्यूब चॅनलवर तो रिलीज करतो. तो म्हणतो की मी जे काही शोध लावतो किंवा बनवतो, ते गावातील लोकांसाठी असतात.  मी ही बाईक फक्त गावकऱ्यांसाठी बनवली होती. आता तो सौरऊर्जा आणि बॅटरीवर चालणारे विमान बनवण्याच्या तयारीत आहे.
तो म्हणतो, सगळ्यांना माहीत आहे की दोन आणि तीन सीटर बाइक्स आधीच बाजारात आहेत. म्हणूनच मी विचार केला की 6 सीटर सायकल का बनवू नये. गावकऱ्यांना याचा अधिक फायदा होणार आहे. सायकल बनवण्यासाठी भंगारातून अनेक वस्तू गोळा केल्या गेल्या आणि 12 हजार रुपये खर्चून सायकल तयार झाली. ती बॅटरीवर चालते. ती एकदा चार्ज केल्यावर 150 किलोमीटर प्रवास करू शकते.

No comments:

Post a Comment

शेतकऱ्यांचा खास मित्र: खोकड

खोकड हा एक लहान आकाराचा सस्तन प्राणी आहे.हा मांसाहारी गणाच्या कॅनिडी कुलातील आहे. या कुलात कुत्रा, लांडगा, कोल्हा, वन्य कुत्रा, इ. प्राणी ये...