तंत्रज्ञानाच्या या विश्वात 20 वर्षे घालवल्यानंतर, डॉ तथागतो राय यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेने सुसज्ज असे उपकरण तयार केले आहे जे एका मिनिटात माणसाला कोणता रोग आहे हे ओळखते. त्याला एआय 100 असे नाव देण्यात आले आहे.डॉ. राय सांगतात की त्यांचे बालपण विज्ञानाचे जग समजून घेण्यात गेले. वडील इंडियन असोसिएशन फॉर कल्टिव्हेशन ऑफ सायन्समध्ये प्राध्यापक होते. ४५ वर्षीय डॉ. राय यांनी आयआयटी खडगपूरमधून बीटेक आणि पीएचडी पूर्ण केली. सन 2000 मध्ये एका अमेरिकन सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीत काम करायला सुरुवात केली. डॉ. राय यांच्या वडिलांचा मृत्यू झाला तो तीव्र रक्ताचा कर्करोग यामुळे! वेळेत निदान ओळखता आले नाही, याची खंत त्यांना होती. म्हणून त्यांनी इतर कोणाचा मृत्यू होणार नाही, यासाठी संशोधन केले आणि हे एआय 100 उपकरण विकसित केले. तपासात दिरंगाई होता कामा नये आणि वेळेवर उपचार केल्यास मानवी जीव वाचू शकतो, म्हणून हे यंत्र तयार करण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या मशीनमध्ये मायक्रोस्कोपिक लेन्स, एलईडी इल्युमिनेशन युनिट आणि कॉम्प्लिमेंटरी मेटल ऑक्साईड कॅमेरा वापरण्यात आला आहे.
अशाप्रकारे काम करते मशीन- ते म्हणतात, सामान्यतः रक्त तपासणी यंत्र रक्ताच्या नमुन्याची चाचणी करते, परंतु ते रुग्णाच्या नमुन्याचे चित्र देखील वाचू शकते आणि रोगाबद्दल सांगू शकते. यात अशाप्रकारे सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर अशा प्रकारे वापरले आहे की त्याचा स्वयंचलित स्लाइड स्कॅनर रुग्णाच्या नमुन्यांना प्रतिमांमध्ये रूपांतरित करतो आणि रोगाचे निदान करण्यासाठी त्यांचे विश्लेषण करतो.

No comments:
Post a Comment