आर्माडिलो हा विचित्र प्राणी अमेरिकेत आढळतो. आर्माडिलो हा सस्तन प्राणी आहे, जो दिसायला खूपच लहान दिसतो, परंतु चातुर्याच्याबाबतीत तो मोठ्या प्राण्यांनाही मागे टाकतो. आर्माडिलो सरासरी 12 ते 15 वर्षे जगतात. या लहान सस्तन प्राण्यांची खास गोष्ट म्हणजे संकट आल्यावर तो स्वतःला सहज वाचवू शकतो. कोणत्याही मोठ्या हल्ल्यादरम्यान, तो त्याचे शरीर फुटबॉलच्या आकारात दुमडतो. या दरम्यान, त्याला ओळखणेदेखील कठीण जाते. त्याची त्वचा एवढी कडक असते की त्यावर गोळीचाही परिणाम होत नाही. म्हणूनच त्याला 'बुलेट प्रूफ' प्राणी असेही म्हणतात. बुलेट प्रूफ त्वचेमुळे स्वतःचा सहज बचाव करू शकतो. त्याची लांबी 38 ते 58 सेमी आणि उंची 15 ते 25 सेमी दरम्यान असते. त्याचे वजन 2.5 ते 6.5 किलो दरम्यान असते. आर्माडिलो सरासरी 12 ते 15 वर्षे जगतात. ते तपकिरी, पिवळे आणि गुलाबी रंगाचे असतात. त्याच्या सुमारे 20 प्रजाती आढळतात आणि त्या सर्व लॅटिन अमेरिकेत आढळतात. आर्माडिलो जमिनीखाली बिळामध्ये किंवा उबदार ठिकाणी राहतात. त्याला थंड हवामान अजिबात सहन होत नाही, अति थंडीमुळे याचा मृत्यूदेखील होऊ शकतो. तो दिवसा झोपतो आणि रात्री शिकार करतो.
हा प्राणी चांगला जलतरणपटू आहे आणि 6 मिनिटांपर्यंत आपला श्वास रोखून धरू शकतो. आर्माडिलोची नखे खूप तीक्ष्ण आणि मजबूत असतात, ज्याद्वारे तो स्वतःसाठी बिळ खोदतो. बेबी आर्माडिलो हाडाशिवाय आणि विशेष कोट (मजबूत कातडी) सह जन्माला येतो.मऊ त्वचेचे कठोर चिलखत कातडीत रूपांतर होण्यासाठी काही आठवडे लागतात. त्यांच्या मुलांना पप्स म्हणतात.
त्याचे डोके, पाठ, पाय आणि शेपटी एका विशेष मजबूत थराने झाकलेली असते. किडे-कीटकांव्यतिरिक्त आर्माडिलो लहान सस्तन प्राणी, पक्ष्याची पिल्लं,अंडी, वनस्पतींची मुळं आणि फळं खाण्यास प्राधान्य देतात. त्याची जीभ लांबलचक आणि चिकट असते, जी मुंग्या आणि दीमकांची शिकार करण्यास मदत करते. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:
Post a Comment