Monday, May 22, 2023

भारतात ज्यांच्या स्वाक्षरीने नोटा छापल्या जातात, त्यांचा पगार किती आहे माहीत आहे का?


आरबीआय गव्हर्नरबद्दल सर्व काही जाणून घ्या- रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) सध्या 2,000 रुपयांची नोट चलनातून बाद करण्याच्या निर्णयामुळे चर्चेत आहे.आरबीआयने तीन दिवसांपूर्वी ही घोषणा केली होती.  या नोटा ३० सप्टेंबरपर्यंत वैध असतील. आरबीआयचे प्रमुख गव्हर्नर असतात. त्यांच्या सहीने नोटा छापल्या जातात. आज आम्ही तुम्हाला RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्याबद्दल सांगणार आहोत. शशिकांत दास ही ती व्यक्ती आहे, ज्यांच्या स्वाक्षरीसह नोटा देशात छापल्या जातात. सध्याच्या सर्व नोटांवर तुम्हाला त्यांची सही दिसेल.जाणून घेऊया आरबीआय गव्हर्नरचा पगार किती आहे?  सध्याचे आरबीआय गव्हर्नर शशिकांत दास कोण आहेत?

पहिल्यांदा आरबीआयच्या गव्हर्नरबद्दल जाणून घ्या- मूळचे ओडिशाचे असलेले शक्तिकांत दास यांचा जन्म २६ फेब्रुवारी १९५७ रोजी भुवनेश्वर येथे झाला.ते तामिळनाडू केडरचे 1980 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. शशिकांत दास हे वित्त आयोगाचे सदस्यही राहिले आहेत.  गुंतागुंतीच्या मुद्द्यांवर एकमत निर्माण करण्यावर विश्वास ठेवणारे म्हणून दास ओळखले जातात. शक्तिकांता दास यांनी दिल्ली विद्यापीठातून इतिहास विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. 2008 मध्ये त्यांना पहिल्यांदा अर्थ मंत्रालयात सहसचिव बनवण्यात आले.  त्यावेळी पी. चिदंबरम अर्थमंत्री होते. 

शशिकांत दास यांना दुसरी टर्म मिळाली आहे. नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर दुसरी टर्म मिळवणारे शक्तिकांत दास हे रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर आहेत. 1980 च्या बॅचचे आयएएस असलेल्या दास यांनी 10 डिसेंबर 2018 रोजी या पदाची सूत्रे हाती घेतली. 2021 मध्ये त्यांचा कार्यकाळ तीन वर्षांसाठी वाढवण्यात आला.

 2018 मध्ये त्यांनी उर्जित पटेल यांची जागा घेतली होती.  उर्जित पटेल यांची सप्टेंबर 2016 मध्ये आरबीआय चे 24 वे गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, परंतु त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांनी वैयक्तिक कारणास्तव आरबीआय गव्हर्नर पदाचा अचानक राजीनामा दिला.

शक्तिकांता दास यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. शक्तीकांता दास यांनी इतर विविध पदे जसे की आर्थिक व्यवहार विभाग, वित्त मंत्रालयात सहसचिव अर्थसंकल्प, तमिळनाडू सरकारच्या महसूल विभागातील आयुक्त आणि विशेष आयुक्त, सचिव, उद्योग विभाग, तामिळनाडू इत्यादी पदांवर काम केले आहे.

आरबीआय गव्हर्नरचा पगार किती आहे?

आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांचा पगार दरमहा अडीच लाख रुपये आहे. मात्र, काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, यावर्षी त्याच्या पगारात वाढ करण्यात आली आहे. आता आरबीआय गव्हर्नरचा पगार साडेतीन लाखांवर गेला आहे.  याशिवाय आरबीआय गव्हर्नरला सरकारकडून निवास, वाहन, ड्रायव्हर आणि इतर सुविधाही मिळतात. 

 डेप्युटी गव्हर्नरचा पगार किती?

आरबीआय गव्हर्नरनंतर चार डेप्युटी गव्हर्नर आहेत.  यामध्ये महेश कुमार जैन, एमडी पात्रा, एम राजेश्वर राव आणि टी रबी शंकर यांचा समावेश आहे. चार डेप्युटी गव्हर्नरांचे वेतन दरमहा २.२५ लाख रुपये आहे.  डेप्युटी गव्हर्नरनाही सरकारकडून अनेक सुविधा दिल्या जातात.

No comments:

Post a Comment

शेतकऱ्यांचा खास मित्र: खोकड

खोकड हा एक लहान आकाराचा सस्तन प्राणी आहे.हा मांसाहारी गणाच्या कॅनिडी कुलातील आहे. या कुलात कुत्रा, लांडगा, कोल्हा, वन्य कुत्रा, इ. प्राणी ये...