Sunday, May 28, 2023

बारा वर्षांची अवनी करते 'पपेट शो'


अवघ्या १२ वर्षांच्या अवनी भंडारी हिने 'पपेट-शो' अर्थात बाहुली नाट्य या कलाप्रकांरात प्रावीण्य मिळवले असून, ती चक्क व्यावसायिक प्रयोग करत आहे. तिची आई, चैताली माजगावकर-भंडारी या प्रसिद्ध पपेट आर्टिस्ट आहेत. त्यांचा वारसा अवनी लहान वयापासूनच चालवत आहे. अवनी लहान असताना विंगेत बसून आईला सादरीकरण करताना पाहत असे. त्यातून तिलाही या कलेची आवड निर्माण झाली. मग घरगुती कार्यक्रमांमध्ये तिने आपले प्रयोग सुरू केले. हळूहळू जम बसत गेल्यावर आता व्यावसायिक पद्धतीने अवनी सादरीकरण करू शकते. वयाच्या सातव्या वर्षांपासून ती आईसह 'पपेट शो' करते आहे. आता ती बारा वर्षांची असून, तिने आजवर जवळपास ७५ प्रयोग केले आहेत. सध्या ती प्रभात रस्त्यावरील सिंबायोसिस शाळेत सहाव्या इयत्तेत शिकते आहे. 

हँड पपेट, ग्लो पपेट, स्टीक पपेट या बाहुल्या अवनी लीलया पद्धतीने नाचवते. शब्दभ्रम ही कला तर तिने अगदी लहानपणापासून अवगत केली आहे. उन्हाळ्याच्या सुटीत, तर अवनी तिच्या आईसोबत सततच्या प्रयोगांमध्ये व्यग्न आहे. तिचा जुळा भाऊ, अर्णव : भंडारी हा पपेट विक्रीचा स्टॉल एकहाती सांभाळतो. 'पपेट शो' कला काळच्या पडद्याआड जाण्याची परिस्थिती असताना, ती जिवंत ठेवण्यासाठी या माय लेकी प्रयत्न करत आहेत.  स्वतः चैताली माजगावकर-भंडारी या गेली अनेक वर्षे सातत्याने 'पपेट  शो' करत आहेत. त्यांचे वडील सुरेंद्र माजगावकरदेखील हे प्रयोग  करत असत. आता ही तिसरी पिढी, अवनी आणि अर्णव ही दोन्ही  मुले आपापल्या परीने ही कला जतन करण्याचे आणि तिचा प्रसार  करण्याचे प्रयत्न करत आहेत. 

बाहुलीनाट्य म्हणजे काय? 

 पपेट हा अर्थात बाहुलीनाट्य या कलेचा उगम अनेक  शतकांपूर्वी झाला असावा. मनोरंजनाची साधने कमी असताना  बाहुल्यांचे खेळ होत. कठपुतली, बोलक्या बाहुल्या, सावलीच्या  बाहुल्या, हातातल्या बाहुल्या, काठीवरच्या बाहुल्या असे अनेक  प्रकार या कलेत येतात. समोरची बाहुली पूर्णतः निर्जीव आहे, याची प्रेक्षकांना कल्पना असतानाही आपल्या आवाजाच्या कौशल्याने आणि उत्तम हस्त नियंत्रणातून हातातील बाहुलीला  जिवंत करणारी शक्ती म्हणजे शब्दभ्रमकार (पपेट आर्टिस्ट)






No comments:

Post a Comment

शेतकऱ्यांचा खास मित्र: खोकड

खोकड हा एक लहान आकाराचा सस्तन प्राणी आहे.हा मांसाहारी गणाच्या कॅनिडी कुलातील आहे. या कुलात कुत्रा, लांडगा, कोल्हा, वन्य कुत्रा, इ. प्राणी ये...