That’s The Spirit
यंगिस्तान
मुंबईच्या तृप्तराजने लहानपणापासूनच तबला वादनाच्या आपल्या अनोख्या कौशल्याची ओळख जगाला करून दिली आहे. त्यांनी 200 हून अधिक शो केले आहेत.
नाव: तृप्तराज पंड्या
वय: 16 वर्षे
उपलब्धी: वयाच्या सहाव्या वर्षी सर्वात छोटा तबलावादक म्हणून गिनीज बुकमध्ये आपले नाव कोरले आहे. ग्लोबल चाइल्ड प्रॉडिजी अवॉर्ड, बाल कला रत्न पुरस्कार यासह अनेक सन्मान मिळाले आहेत. 2019 साठी पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार मिळाला आहे.
तृप्तराज यांनी वयाच्या दोन वर्षापासून तबला वाजवण्यास सुरुवात केली. वयाच्या दुसऱ्या वर्षी मुंबईतील सोमय्या कॉलेजमध्ये त्याचा पहिला सार्वजनिक कार्यक्रम झाला. वयाच्या तिसऱ्या वर्षी त्याचा ऑल इंडिया रेडिओवर थेट तबलावादनाचा कार्यक्रम केला. त्यानंतर वयाच्या चौथ्या वर्षी त्याची प्रतिभा दूरदर्शनवर प्रसारित झाली. वयाच्या 6 व्या वर्षी त्याला सर्वात छोटा तबला विशारद (मास्टर) म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र देऊन त्याचा गौरव करण्यात आला. यानंतर तो पुढे पुढे जात राहिला आणि आतापर्यंत त्याने 200 हून अधिक जाहीर कार्यक्रम केले आहेत. तबला वाजवण्याबरोबरच त्याला बास्केटबॉल खेळायलाही आवडते. तो त्याच्या शाळेच्या बास्केटबॉल संघाचा कर्णधार आहे. त्याला इतिहास विषय फार आवडतो आणि मोकळ्या वेळेत विविध विषयांवरील माहितीपट बघायला आवडतात.
-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:
Post a Comment