देशात सहज दिसणाऱ्या पक्ष्यांची संख्याही आता सातत्याने कमी होत आहे. त्यामुळे देशातील पक्ष्यांच्या संवर्धन आणि संरक्षणावर विशेष भर देण्याची गरज असल्याचा निष्कर्ष स्टेट ऑफ इंडियन बर्ड्स २०२३'च्या नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालात नमूद आहे. अहवालात अनेक महत्त्वाच्या समस्यांवर प्रकाश टाकला आहे.
स्टेट ऑफ इंडियन बर्ड्स (एसओआयबी) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या अहवालात देशात नियमितपणे आढळणाऱ्या बहुतेक प्रजातींच्या क्षेत्र आणि वर्गवारीप्रमाणे मूल्यांकन केले जाते. २०२३ च्या अहवालाच्या निकषांप्रमाणे तसेच संवर्धन स्थितीचे मूल्यांकन करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. एसओआयबीचा पहिला अहवाल २०२० मध्ये प्रकाशित झाला होता. दुसऱ्या अहवालात ३० दशलक्षांहून अधिक पक्षीनिरिक्षणांची नोंद ३० हजाराहून अधिक पक्षीअभ्यासकांनी करून त्याचे मूल्यांकन केले आहे.
अहवालातील बाबी -
● ३० दशलक्ष हून अधिक निरीक्षणे
● ३०,००० हून अधिक पक्षीनिरीक्षक
●९४२ पक्षी प्रजातींची संवर्धन प्राधान्याला वर्गवारी
● १४ प्रजाती - आययूसीएन कडे पुनर्मूल्यांकनासाठी
●१७८ प्रजाती - सर्वोच्च संवर्धन प्राधान्य
●२१७ प्रजाती - स्थिर आणि संख्या वाढणाऱ्या
● स्मॉल प्रॅटिनकोल, लिटल रिंग्ड प्लोवर, ग्रेट थिक नी, आणि स्मॉल टर्न - ५०-८० टक्के संख्येत घट
● गवताळ प्रदेशातील ग्रेट इंडियन बस्टर्ड आणि लेसर फ्लॉरिकन यांच्या संख्येत लक्षणीय घट
●पायाभूत सुविधांचा मोठ्या पक्ष्यांना फटका
● उत्खनन, वृक्षतोड यांच्यामुळे मोठ्या प्रमाणावर अधिवासाचा र्हास
(संकलन-आयर्विन टाइम्स टीम)
No comments:
Post a Comment