Monday, September 25, 2023

(नॉलेज कॉर्नर) 'आरओ' कसे करते पाणी स्वच्छ?


हॉटेल, घर, ऑफिस किंवा बाहेर फिरताना लोक दररोज फिल्टर केलेले पाणी पितात. अनेक लोकांच्या घरी ते तुम्हाला बसवलेले आढळेल.तुम्ही कधी विचार केला आहे का RO म्हणजे काय?   आणि हे कसे कार्य करते? तर या संबंधित रंजक माहिती जाणून घेऊया.  आर ओ म्हणजे रिव्हर्स ऑस्मोसिस (Reverse Osmosis) ही एक जलशुद्धीकरण प्रक्रिया आहे, जी पिण्याच्या पाण्यातील सर्व प्रकारच्या लहान-मोठ्या अशुद्ध बाबी काढून टाकल्या जातात.या प्रक्रियेद्वारे, क्लोरीन आणि मीठ सारख्या दूषित आणि अशुद्ध गोष्टी काढून टाकल्या जातात. यासाठी या प्रक्रियेत सेमीपरमिएबल मेम्ब्रेनचा वापर केला जातो.ऑस्मोसिसमध्ये लहान-मोठ्या अशुद्ध बाबीव्यतिरिक्त सूक्ष्मजंतू देखील काढले जातात. ही प्रक्रिया केवळ शुद्ध H2O मागे ठेवून मॉलिक्यूलर पातळीपर्यंत पाणी स्वच्छ करते.

RO मधील पाणी स्वच्छ करण्यासाठी अनेक फिल्टर, मेम्ब्रेन आणि यूव्ही लाइटचा वापर केला जातो. या तिघांमधून गेल्यावर पाणी स्वच्छ होते. RO मध्ये सहसा तीन फिल्टर दिले जातात. या फिल्टरच्या मदतीने धूळ पाण्यापासून वेगळी केली जाते. तुम्ही अनेकदा आरओच्या बाहेर पाहिले असेल जिथे पाण्याचे कनेक्शन आहे तिथे सिलेंडरसारखा भाग असतो. त्याच्या आत पहिला फिल्टर आहे, जो तीन महिन्यांनंतर बदलला पाहिजे. यानंतर पाणी शुद्ध करण्यासाठी आणखी दोन फिल्टर दिले जातात. 

RO मध्ये सामान्य फिल्टर व्यतिरिक्त, एक मेम्ब्रेनसुद्धा असते. त्यात अतिशय बारीक फिल्टर्स असतात, जे खाऱ्या पाण्यापासून मीठ वेगळे करतात आणि पाणी गोड करतात. RO मध्ये मेम्ब्रेनचा वापर सुमारे एक वर्ष करता येतो. RO ची मेम्ब्रेन खराब झाल्यास पाण्याची चव बदलू लागते.

यूव्ही लाईट टेक्नॉलॉजी  किंवा आपण त्याला अल्ट्राव्हायोलेट तंत्रज्ञान देखील म्हणू शकता. ही प्रक्रिया वॉटर प्युरिफायरच्या शेवटच्या टप्प्यात होते, ज्यामध्ये पाण्यात असलेले जंतू नष्ट होतात आणि तुमचे पाणी पिण्यायोग्य स्वच्छ होते. आणि त्याचा तुमच्या शरीरावर कोणताही वाईट परिणाम होत नाही.

ही आहे तांत्रिक प्रक्रिया आहे

रिव्हर्स ऑस्मोसिसच्या प्रक्रियेत, उच्च-दाब पंपद्वारे आरओच्या सॉल्टच्या बाजूला दाब वाढविला जातो. मग ते सेमीपरमिएबल आरओ मेम्ब्रेन शक्तीने पार केले जाते. यामुळे, सुमारे 95 ते 99 टक्के विरघळलेले सॉल्ट रिजेक्ट स्ट्रीममध्ये राहते.

रिव्हर्स ऑस्मोसिसचे फायदे काय आहेत?

या प्रक्रियेचा उपयोग पाण्यातून विविध प्रकारचे विरघळलेले आणि टाकाऊ रासायनिक कण तसेच जीवाणू सारख्या जैविक घटकांना प्रभावीपणे काढून टाकण्यासाठी केले जाऊ शकते.या तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात द्रव वेस्ट किंवा डिस्चार्जवर प्रक्रिया करण्यासाठी केला जाऊ शकतो. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


No comments:

Post a Comment

शेतकऱ्यांचा खास मित्र: खोकड

खोकड हा एक लहान आकाराचा सस्तन प्राणी आहे.हा मांसाहारी गणाच्या कॅनिडी कुलातील आहे. या कुलात कुत्रा, लांडगा, कोल्हा, वन्य कुत्रा, इ. प्राणी ये...