आपल्या आजूबाजूला आढळणारे सर्व प्राणी एक तर सरपटत चालतात किंवा चालतात. पक्षी आकाशात उडतात कारण पक्ष्यांना पंख असतात, पण काही प्राणी असे आहेत की त्यांना पंख नसले तरीही ते उडतात.
उडणारा साप - बहुतेक उडणारे साप क्रायसोपेलिया वंशाचे सदस्य आहेत.ते प्रामुख्याने श्रीलंका, दक्षिण चीन, फिलीपिन्स आणि पश्चिम भारतात आढळतात. त्यांच्या लांबीबद्दल बोलायचं म्हटलं तर ते 4 फूट लांबीचे असतात. ते मानवांसाठी विषारी नसतात, परंतु त्यांच्या चाव्याचा परिणाम दिसून येतो. हे साप उडतात आणि आपल्या भक्ष्याची शिकार करतात.सरडे, उंदीर, वटवाघुळ आणि पक्षी हे या सापांचे खाद्य आहे.
उडणारा बेडूक- रॅकोफोरस बेडूक इंडोनेशिया, सुमात्रा आणि फिलिपाइन्समध्ये आढळतो. ज्याला फ्लाइंग फ्रॉग असेही म्हणतात.या प्रजातीच्या बेडकांना बहुतेक झाडांवर राहायला आवडते. रॅकोफोरस बेडूक अंडी घालण्याच्या वेळीच जमिनीवर उतरतात.
कोलुगो - कोलुगो फ्लाइंग लेमर म्हणून ओळखले जातात, परंतु ते लेमरशी संबंधित नाहीत. कोलुगो हवेतून उडू शकतो. कोलुगोची खास गोष्ट म्हणजे शरीराच्या अवयवांना जोडणारा पडदा त्यांच्या शेपटीलाही जोडलेला असतो. त्यामुळे ते वटवाघुळसारखे दिसतात.
उडणारी खार - या खारीचे नाव टेरोमायनी किंवा पेटॉरिस्टिने आहे. या गिलहरी झाडांच्या पोकळ आणि पानांच्या घरट्यांमध्ये राहतात.उडत्या खारी प्रामुख्याने दक्षिण मिनेसोटाच्या जंगलात आढळतात.
फ्लाइंग स्क्विड- फ्लाइंग स्क्विड हा एक मासा आहे जो पाण्यातून वर उडू शकतो तसेच पोहू शकतो. त्याच्या अनेक प्रजाती आढळतात. जपानी फ्लाइंग स्क्विड (Todorados pacificus) हा अधिक आकर्षक मासा आहे. हे मासे पॅसिफिक महासागराच्या उत्तरेकडील भागात कोरिया, जपान, किनारी चीन, रशिया येथे आढळतात.
-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली






No comments:
Post a Comment