Tuesday, February 21, 2023

गर्भपातानंतर आयुष्य बदलले, मुलींसाठी उद्योजक बनली


बेंगळुरू शहरातील श्रीदेवी आशालाचे आयुष्य बदलले जेव्हा डॉक्टरांनी तिला तिच्या गर्भपातामागील एक कारण आरोग्यदायी जीवनशैली नसल्याचं सांगितलं.  39 वर्षीय सॉफ्टवेअर अभियंता असलेल्या श्रीदेवीच्या लक्षात आले की आरोग्यदायी जीवनशैलीचा आपल्या आरोग्यावर किती वाईट परिणाम होतो. त्यानंतर तिने आपल्या पतीसोबत नव्याने जीवन सुरू केले. सकस आहाराला आणि योगासने  यांना प्राध्यान दिले. श्रीदेवी ज्या ज्यावेळी बाजारातून खाद्यपदार्थ विकत घेई, तेव्हा त्या त्यामधील पोषक तत्वे आवर्जून तपासत पाहत असे. तिने आपल्या पहिल्या मुलीच्या जन्मानंतर असेच केले तेव्हा तिला समजले की मुलांच्या खाद्यपदार्थांमध्ये देखील रसायने असतात. त्यानंतर 2019 मध्ये तिने आपला टमी फ्रेंडली बेबी फूड स्टार्टअप सुरू केला.

श्रीदेवी सांगते की, पहिल्या मुलीसाठी बाजारातून हेल्दी फूड विकत घेणं हे आव्हान होतं.  त्यानंतर दुसरी मुलगी झाली, त्यामुळे मुलींच्या आरोग्यासाठी त्यांनी नोकरी सोडून स्टार्टअप सुरू केले. 6 महिन्यांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना सेंद्रिय आरोग्यदायी आहार देण्यासोबतच ती आज महिन्याला 10 लाख रुपये कमवत आहे.

No comments:

Post a Comment

शेतकऱ्यांचा खास मित्र: खोकड

खोकड हा एक लहान आकाराचा सस्तन प्राणी आहे.हा मांसाहारी गणाच्या कॅनिडी कुलातील आहे. या कुलात कुत्रा, लांडगा, कोल्हा, वन्य कुत्रा, इ. प्राणी ये...