Thursday, March 30, 2023

केंद्रात 9.79 लाखांहून अधिक पदे रिक्त

वाढत्या बैरोजगारीबद्दल नेहमी बोलले जाते; परंतु १ मार्च २०२१ पर्यंत रेल्वेमधील सर्वाधिक २.९३ लाख पदांसह विविथ केंद्र सरकारच्या विभागांमध्ये तब्बल ९७९ लाखांहून अधिक रिक्‍त पदे आहेत. खुद्द केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी बुधवारी ही माहिती दिली. 

भाजपचे सदस्य सुशील कुमार मोदी यांनी राज्यसभेत विचारलेल्या प्रश्‍नाच्या लेखी उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. केंद्र सरकारची विविध मंत्रालये, विभाग आणि संस्थांच्या आवश्यकतेनुसार रिक्‍त पदे भरण्याची प्रक्रिया निरंतर सुरू आहे, असे सिंह म्हणाले. 

सरकारने आधीच सर्व मंत्रालये/विभागांना न भरलेली पदे वेळेवर भरण्यासाठी सूचना जारी केल्या आहेत.अशी आहे रिक्‍त पदांची संख्या (लाखांत) 

@ संरक्षण (नागरी) : २.६४ , गृह विभाग: १.४३  , टपाल खाते : ९०,०५० , महसूल : ८०२४३ ,भारतीय लेखापरीक्षण विभाग : २५,९३४, अणुऊर्जा विभाग; ९४६० 


 




No comments:

Post a Comment

शेतकऱ्यांचा खास मित्र: खोकड

खोकड हा एक लहान आकाराचा सस्तन प्राणी आहे.हा मांसाहारी गणाच्या कॅनिडी कुलातील आहे. या कुलात कुत्रा, लांडगा, कोल्हा, वन्य कुत्रा, इ. प्राणी ये...