भारताने सन 2015 ते 2020 या काळात तब्बल सहा लाख 68 हजार 400 हेक्टर जंगल गमावले आहे. जंगलांच्या ऱ्हासाच्या संदर्भात भारत ब्राझीलपाठोपाठ दुसरा क्रमांकावर आहे. यासंदर्भातील अभ्यास https://ourworldindata.org/ या आंतरराष्ट्रीय संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आला आहे. जगातील सुमारे 98 देशांमध्ये गेल्या 30 वर्षांत झालेल्या जंगलतोडीची माहिती या अभ्यासात दिली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेच्या आकडेवारीच्या आधारे हे विश्लेषण करण्यात आले आहे.
वर्ष 1990 ते 2000 आणि 2015 ते 2020 या काळातील माहिती आणि आकडेवारीच्या आधारे हे विश्लेषण करण्यात आले आहे. जगाचा विचार करता मागील 30 वर्षात भारतात सर्वाधिक जंगलतोड झाली आहे. त्यातही, 2015 ते 2020 या काळात ही जंगलतोड प्रचंड प्रमाणात करण्यात आली. या काळात भारतात सहा लाख 68 हजार 400 हेक्टर जंगल तोडले गेले. 1990 ते 2000 या काळात तीन लाख 84 हजार हेक्टर जंगल देशाने गमावले होते. इतर देशांच्या तुलनेत देशातील जंगलतोडीची गती सर्वाधिक आहे. भारताच्या वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागवण्यासाठी ही जंगलांची तोड करण्यात आल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. जंगलतोडीचा वेगही अधिक सन 1990 ते 2000 या काळात झालेल्या ऱ्हासाच्या तुलनेत 2010 ते 2020 याकाळात भारतात झालेल्या जंगलतोडीचा वेग हा जगात सर्वाधिक आहे. या काळातील जंगलतोडीच्या वेगाच्या बाबतीत झांबिया दुसर्या क्रमाकांवर असल्याचे या अहवालात म्हटले आहे. भारतात 1090 पर्यंत तृक्षतोडीचे प्रमाण आणि गती फारच कमी होती. मात्र, त्यानंतरच्या एका दशकात जंगलतोठीचे प्रमाण एकाएकी वाढले आणि पुढील प्रत्येक दशकात ही स्थिती कायम राहिली.
कारणे कोणती? वाढणारी लोकसंख्या, शेतजमिनीचे वाढलेले क्षेत्र, उपभोगाचे वाढलेले प्रमाण आणि हवामानबदल अशा विविध कारणांमुळे जंगलांचा ऱ्हास झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. मार्च महिन्यातच हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.
.jpg)
No comments:
Post a Comment