Sunday, April 2, 2023
(नॉलेज ट्रॅव्हल्स) तवांगचे मनमोहक सौंदर्य
तवांग हे अरुणाचल प्रदेशात आहे. हे देशातील सर्वात मोठ्या बौद्ध मठासाठी देखील ओळखले जाते. येथे दऱ्या, नद्या आणि धबधबे, हिरवळ विशेषतः पर्यटकांना आकर्षित करतात. तवांगच्या निसर्गसौंदर्याने पर्यटक मंत्रमुग्ध होतात. तवांग मठ हा भारतातील सर्वात मोठा मठ आहे. हे तवांग नदीच्या खोऱ्यात वसलेले आहे. मठात हस्तलिखिते, पुस्तके आणि इतर कलाकृतींचा अद्भुत संग्रह आहे. येथील नुरानंग धबधबा 'जंग फॉल्स' म्हणूनही ओळखला जातो. ते सुमारे शंभर मीटर उंचीवर आहे. बुमला दरीचे अफाट सौंदर्य पर्यटकांना आनंदित करते. येथील तवांग युद्ध स्मारक (वॉर मेमोरियल) चाळीस फूट उंचीवर वसलेले असून ते स्तूपाच्या रचनेच्या रूपात बांधलेले आहे. हे स्मारक भारत-चीन युद्धातील हुतात्म्यांना समर्पित आहे. हे स्मारक सुंदर शिखरांच्या मध्ये वसलेले आहे. या स्मारकाला नामग्याल चोरटेन असेही म्हणतात. तवांगची संस्कृती, सण, उत्सवही पर्यटकांना खूप आकर्षित करतात. तवांगच्या खाद्यपदार्थांबद्दल बोलायचे झाले तर भात हे येथील लोकांचे मुख्य अन्न आहे. भोजनात मका-बाजरीही वापरली जाते. वांगी, भोपळा, मोहरीची पाने, बांबूच्या नवीन कोंबांच्या भाज्याही मोठ्या चवीने खातात. ड्राय फिश फ्लेक्स, रोस्टेड कॉर्न फ्लेक्स, फ्राईड राईस फ्लेक्स, तांदळाची भाकरी, जंगल कंद, आपोंग, मारुआ, किंग-मिरची आणि डुकराचे मांस हे देखील येथील लोकांचे आवडते खाद्य आहे. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
Subscribe to:
Post Comments (Atom)
शेतकऱ्यांचा खास मित्र: खोकड
खोकड हा एक लहान आकाराचा सस्तन प्राणी आहे.हा मांसाहारी गणाच्या कॅनिडी कुलातील आहे. या कुलात कुत्रा, लांडगा, कोल्हा, वन्य कुत्रा, इ. प्राणी ये...
-
तंत्रज्ञानाच्या या विश्वात 20 वर्षे घालवल्यानंतर, डॉ तथागतो राय यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेने सुसज्ज असे उपकरण तयार केले आहे जे एका मिनिटात म...
-
रोबोट आता बरीच कामे करीत आहे. घर, ऑफिस ची साफसफाई करतो, जेवण सर्व्ह करतो. गाणी म्हणतो, रुग्णांची सेवा करतो. इतकेच नव्हे तर रोबोट रुग्णांवर श...
-
आपल्या देशात नद्यांना मातेचा दर्जा देऊन त्यांची पूजा केली जाते.जसे की गंगा नदीला सर्वात पवित्र नदी म्हटले जाते आणि या नदीची माता म्हणून पूजा...

No comments:
Post a Comment