Wednesday, May 10, 2023

(अचीवमेंट) नंदा देवी : वयाच्या पाचव्या वर्षांपर्यंत केली पाच शिखरे सर


नंदा देवी अवघ्या पाच वर्षांची असून तिने इतक्या कमी वयात पाच पर्वत शिखरांवर पोहचून विक्रम केला आहे. नैनिताल येथील रहिवासी असलेली नंदा देवी ही गिर्यारोहक तुसी आणि अनिल साह यांची कन्या आहे. तुसी साह एक माउंट एव्हरेस्ट विजेता आणि भारतीय पर्वतारोहण महासंघ (IMF) च्या सदस्य आहेत. तुसीच्या मते, नंदा देवीने अलीकडेच १३,००० फूट उंच असलेले चंद्रशिला शिखर पार केले आहे. नंदा देवीचा जन्म 6 नोव्हेंबर 2017 रोजी झाला आणि ती ऑल सेंट्स कॉलेज, नैनिताल येथे इयत्ता 1 मध्ये शिकत आहे. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी पाच पर्वत चढणारी आणि १३,००० फूट उंची गाठणारी ती पहिली बाल गिर्यारोहक आहे.

उत्तरांचल राज्यातील मुख्य देवी म्हणून पूजल्या जाणार्‍या नंदा देवीच्या नावावरून तिचे नाव ठेवण्यात आले आहे. नंदा देवी पर्वत हे भारतातील दुसरे सर्वोच्च आणि जगातील 23 वे सर्वोच्च शिखर आहे. कांचनजंगा हे याहून उंच आणि देशातील सर्वोच्च शिखर आहे. नंदा देवी शिखर हे भारताच्या उत्तरांचल राज्यात पूर्वेला गौरीगंगा खोऱ्यातील आणि पश्चिमेला ऋषीगंगा खोऱ्यांमधील हिमालय पर्वत रांगेत आहे. नंदा देवी हिने वयाच्या अवघ्या दीड वर्षापासून 2019 मध्ये 10500 फुटांवर असलेल्या डोरिटाल येथून गिर्यारोहण सुरू केले. यानंतर तिने 2021 मध्ये यमुनोत्री गाठली आणि 12500 फुटांवर असलेले केदारकंठ ट्रेक केले. 2022 मध्ये 12500 फुटांवर असलेले त्रिंड आणि इंद्रधारा कॅम्प (धर्मशाला) पर्यंत पोहोचली. 2023 मध्ये 12000 फुटांवर असलेले तुंगनाथ आणि 13000 फुटांवर असलेले चंद्रशिला शिखर जिंकले. तूसी यांच्या म्हणण्यानुसार, नंदा पहिल्यांदाच त्यांच्यासोबत गंगोत्रीला गेली होती. तेव्हा ती आठ महिन्यांची होती. यानंतर 2019 मध्ये लेह आणि लडाख देखील पाहिले. नंदा म्हणते की तिला तिच्या आई-वडिलांची स्वप्ने पूर्ण करून गिर्यारोहणात जगात अव्वल स्थान गाठायचे आहे. ती सध्या आई आणि वडिलांकडून गिर्यारोहणातील बारकावे शिकत आहे. जगातील अनेक मोठमोठी पर्वत शिखरे जिंकण्याचा तिचा मानस आहे. तुसी यांनी सांगितले की नंदा आठ महिन्यांची असताना पहिल्यांदा गंगोत्रीला भेट दिली होती. यानंतर 2019 मध्ये लेह आणि लडाख देखील पाहिले.  नंदा हिला गिर्यारोहणाचा वारसा तिच्या आईवडिलांकडून लाभला आहे.  म्हणूनच रोप क्रॉस, वर्मा ब्रिज, शिडी स्विंग इत्यादी साहसी उपक्रम ती सहज करू शकते. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


No comments:

Post a Comment

शेतकऱ्यांचा खास मित्र: खोकड

खोकड हा एक लहान आकाराचा सस्तन प्राणी आहे.हा मांसाहारी गणाच्या कॅनिडी कुलातील आहे. या कुलात कुत्रा, लांडगा, कोल्हा, वन्य कुत्रा, इ. प्राणी ये...