Saturday, May 13, 2023

दिव्यांग मुलीला खाऊ घालण्यासाठी मजूर वडिलांनी बनवला रोबोट


पत्नी आजारी असल्यामुळे आपल्या दिव्यांग मुलीला खाऊपिऊ घालण्यासाठी तिला अडचणी यायच्या ही गरज लक्षात घेऊन एका रोजंदारीवर काम करणाऱ्या तरुणाने चक्क एक रोबोट विकसित केलेला असून त्याचे परिसरात कौतुक केले जात आहे. गोव्यातील पणजी येथे हे कुटुंबीय राहते गोव्यातील स्टेट इनोव्हेशन कौन्सिल यांनी देखील या व्यक्तीचे कौतुक केले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, बिपिन कदम ( वय 40 ) असे या मजुराचे नाव असून ते आपली पत्नी आणि दिव्यांग मुलगी यांच्यासोबत राहतात. रोजंदारीवर काम करणारे दीपक हे पौंडा तालुक्यातील बेथोरा गावचे रहिवासी आहेत. 14 वर्षाची बिपिन यांची मुलगी दिव्यांग असून ती स्वतःच्या हाताने जेवण करू शकत नाही म्हणून आत्तापर्यंत तिला तिची आई रोज जेवण भरवत होती मात्र गेल्या दोन वर्षांपासून आईची देखील तब्येत व्यवस्थित राहत नाही.

पत्नी आजारी आणि आपण इतरत्र कामाला गेल्यामुळे मुलीला खाऊ कुणी घालायचे हा मोठा प्रश्न कुटुंबीय समोर होता त्यानंतर बीपीन यांनी पर्याय शोधायचा म्हणून रोबोट तयार करण्याची योजना आखली आणि कामावरून सुटल्यानंतर रोज बारा-बारा तास काम केल्यानंतर अखेर त्यांनी आपल्या मुलीसाठी रोबोट बनवलेला आहे. रोबोटच्या शरीरावरील एका प्लेटमध्ये जेवण ठेवले जाते आणि दिव्यांग मुलीने व्हॉईस कमांड दिल्यानंतर हा रोबोट तिला खाऊ घालतो. तोंडी आदेशानुसार खाऊ घालणारा रोबोट हा चांगलाच चर्चेत आलेला असून बिपिन कदम यांचे परिसरात मोठे कौतुक केले जात आहे .

महाराष्ट्रात जन्मलेल्या बिपिनला आर्थिक अडचणींमुळे शिक्षण पूर्ण करता आले नाही.  गोव्यात हेल्पर म्हणून कामाला सुरुवात केली आणि सध्या थ्रीडी डिझायनर म्हणून काम करत आहे. हे ज्ञान त्यांनी रोबोट तयार करताना वापरले. ते तयार करण्यासाठी 4 महिन्यांचा कालावधी आणि 12 हजार रुपये लागले. हा रोबोट  आवाजावर काम करतो.  यामध्ये त्याने तीन-चार वाट्या आणि एक चमचा टाकला आहे. वेगवेगळ्या खाद्यपदार्थांच्या नावाने त्याने या रोबोटच्या मेमरीमध्ये बसवली आहे.  अशाप्रकारे रोबोला भात खायला सांगितल्यावर तो भात घेऊन खाऊ घालतो.

No comments:

Post a Comment

शेतकऱ्यांचा खास मित्र: खोकड

खोकड हा एक लहान आकाराचा सस्तन प्राणी आहे.हा मांसाहारी गणाच्या कॅनिडी कुलातील आहे. या कुलात कुत्रा, लांडगा, कोल्हा, वन्य कुत्रा, इ. प्राणी ये...