Monday, June 12, 2023

(ट्रॅव्हल्स कॉर्नर) 52 मंदिरांचे मुक्तागिरी


विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरापासून काहीच अंतरावर सातपुडा पर्वतात मुक्तागिरी धबधबा आहे. अतिप्राचीन मंदिरालगत जवळपास 250 फूट उंचावरून हा धबधबा कोसळतो. मध्यप्रदेशातून वाहत येणारी नाग नदीच्या प्रवाहामुळे हा धबधबा तयार झालाय. उंचावरून धबधब्याच्या रूपाने कोसळणारे पाणी त्याचप्रमाणे पाण्यातून उडणारे तुषार या सर्वाचा आनंद पर्यटक घेत असतात. खळखळ वाहणारी नाग नदी, तिचे उंचावरून कोसळणारे धबधब्याच्या रूपात पाणी, त्याचे अंगावर उडणारे तुषार अशा मनमोहक दृश्यांनी जैनाच्या काशीवर निसर्गाची उधळण ही पावसाळ्यात पर्यटकांची पावले आकर्षित करतात. 

मेंढागिरी आताची मुक्‍तागिरी या ठिकाणी जैन धर्माची ५२ मंदिरे आहेत. या मंदिरांचे वैशिष्ट्य म्हणजे ही सर्वच मंदिरे वेगवेगळ्या शतकातील आहेत. काही पंधराव्या तर काही सोळाव्या शतकातील अतिप्राचीन मंदिरे असून, ती 400 फूट उंच पर्वतावर वसलेली आहेत. चारशे फुटांवरून कोसळणारा धबधबा या ठिकाणी पहावयास मिळतो. विशेष म्हणजे दहाव्या क्रमांकाचे मंदिर अकृत्रिम चैतालय म्हणून ओळखले जाते. या सर्व मंदिरांची निर्मिती एलिसपूरच्या (आताचे अचलपूर) इल राजाने केली. एक हजार वर्षांपूर्वीची भगवान पार्श्वनाथाची मूर्ती या ठिकाणी असून, शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. आजही ही अष्टमीला व पौर्णिमेला केशर चंदनाचा या ठिकाणी वर्षाव होतो. मुक्‍तागिरीला पूर्ण पाहण्यासाठी ४०० पायऱ्या व उतरताना ५०० पायऱ्या लागतात. 250 फुटांवरून कोसळणारा धबधबा भुरळ घालतो. लाकडापासून तयार केलेला रथ यात्रेच्या वेळी बाहेर काढला जातो. दिवाळीनंतरच्या पोर्णिमेला या ठिकाणी जत्रा भरते. येथील व्यवस्थापन पूर्वी धर्मापीठाकडे होते. श्री पद्यानंदजी स्वामीजी त्या धर्मपीठाचे पीठाधीश होते. भक्तांसाठी येथे भक्‍त निवासाची व्यवस्था आहे. भोजनालयसुद्धा सुरू राहते. आजही या ठिकाणी जैन धर्माच्या ऋषीमुनीची ये-जा सुरू राहते. पावसाळ्यात या ठिकाणी पर्यटकासह भक्तांची गर्दी बघायला मिळते. जैनांची काशी म्हणून मुक्‍तागिरीची ओळख आहे. मुक्‍तागिरीला जाणारा मार्ग अमरावती ते परतवाडा ५० किलोमीटर, परतवाडा ते खरपी आठ किलोमीटर, खरपी ते मुक्तागिरी सात किलोमीटर. संस्थानच्या गाडीची व्यवस्था आहे. 

No comments:

Post a Comment

शेतकऱ्यांचा खास मित्र: खोकड

खोकड हा एक लहान आकाराचा सस्तन प्राणी आहे.हा मांसाहारी गणाच्या कॅनिडी कुलातील आहे. या कुलात कुत्रा, लांडगा, कोल्हा, वन्य कुत्रा, इ. प्राणी ये...