पिवळ्या पायांचा बटन लावा हा पक्षी लाजाळू असून तो गवताळ आणि खुरट्या वनात आढळतो. तो सहसा दिसत नाही. हा पक्षी कोंबडीच्या पिल्ला एवढा आहे. इंग्रजीत त्याला 'यलो लेग्ड बटन क्वाइल' असे म्हटले जाते. मादी नरापेक्षा अधिक सुंदर आणि आकाराने मोठी असते. तिला गळ्यामागे नारंगी पिंगट रंगाचा रुंदा पट्टा असतो. पाय व चोच पिवळी जर्द असते आणि हीच तिची ओळख ठरते. उडताना तिची नारंगी तांबूस गळपट्टा, छाती व खालून पांढरा रंग ठळक दिसतो. नराला गळपट्टा नसतो व रंगाने फिकट असतो. पावसाळा हा त्यांचा विणीचा काळ असतो. या काळात मादी नराला अन्न पुरवते. अंडी घातल्यावर मादी नरावर अंडी उगवण्याची जबाबदारी देत निघून जाते. लावा पक्ष्याप्रमाणे त्याच्या पायाला चौथे बोट नसते. माळढोकच्या पायाशी साधर्म्य असल्याने त्यांना 'बस्टर्ड क्वाइल' गटात गणले जाते.
त्यांच्या आहारात हिरव्या वनस्पती सामग्री, बियाणे, आणि बीटल, मुंग्या आणि तळागाळातील विविध कीटकांचा समावेश आहे.हिमांशू टेंभेकर म्हणाले की , या पक्ष्याची काही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. त्यात इतर लावा पक्ष्यांप्रमाणे याला पायाला चौथा बोट नसतो. माळढोकच्या पायाशी साधर्म्य असल्याने त्यांना "bustard Quail" ह्या गटातही गणले जाते.या पक्ष्याच्या माद्या ह्या बहुपतित्व पद्धतीचा अवलंब करता म्हणजेच एका विणीच्या हंगामात अनेक नरांशी समागम करून घरटी बनवून अंडी देतात. पावसाळ्यात मानवी वस्ती जवळ सुरक्षेसाठी त्या वावरत असतात व कधी कधी ग्रामीण भागात घरात देखील शिरतात. मुख्य म्हणजे महाराष्ट्रात ह्या पक्ष्याच्या हातावर मोजण्याइतक्या नोंदी आहे रहिवासी असून इतक्या कमी नोंदी असण्याचे कारण म्हणजे हा पक्षी खूप लाजाळू असतो तसेच तो केवळ पावसाळ्यातच आवाज करतो त्यामुळे त्याला शोधणे आणि त्याचा एकूण अभ्यास करणे कठीण आहे. अलीकडे हा पक्षी मध्यप्रदेश कान्हा राष्ट्रीय उद्यानातीलअभयारण्य व महाराष्ट्रात धुळ्यात आढळून आला आहे. भारतात लावा पक्ष्याच्या सात जाती आढळून येतात. त्यात करड्या रंगाचा लावा मोठ्या प्रमाणात आढळून येतो.
छायाचित्र सौजन्य सकाळ


No comments:
Post a Comment