Friday, July 28, 2023

सुरपाट्या : ग्रामीण भागातला रांगडा खेळ


गेल्या काही वर्षांत मोबाईल, टीव्ही, इंटरनेटच्या जाळ्यात अडकलेली नवीन पिढी मैदानाकडे फिरकत नव्हती, मात्र खेळाचे महत्त्व लक्षात आल्याने हळूहळू का होईना यात बदल होत आहे. क्रिकेट तर सर्वत्र खेळला जातो आहेच मात्र ग्रामीण भागात सुरपाट्या हा खेळ आबालवृद्धांचा आवडता खेळ आहे.  या रांगड्या गावठी खेळाला पसंती दिली जात आहे त्याला अनेक कारणे आहेत. सूरफाटया खेळण्यास अत्यंत सोपा; तसेच काही खर्चही लागत नाही, ही या डावाची जमेची बाजू म्हणावी लागेल. आज क्रीडा क्षेत्रात देशभर क्रिकेटच्या मक्तेदारीचा डंका वाजत असताना ग्रामीण भागात खेळला जाणारा सूरफाटयाचा खेळ आजही तितकाच लोकप्रिय आहे. याला अनेक ठिकाणी आट्यापाट्या नावानेही संबोधतात, ग्रामीण भागात खेळताना पंचाशिवाय हा डाव चालत असल्याने यात खेळाडूंच्या खिलाडू वृत्तीचेही दर्शन घडते. 

 या खेळासाठी वेग, तंत्र, चपळता व डावपेचाची आखणी फार गरजेची असते, तरच या खेळामध्ये खेळाडूंचा सांधिक प्रयत्न संघाला जिंकवू शकतो. कबड्डी, कुस्ती, खो-खोप्रमाणेच सूरफाट्या हा खेळही मराठी मातीतला; पण तरीही शासन दरबारी दुर्लक्षित आहे.सांधिक आणि वैयक्तिक कौशल्य पणाला लागत असलेल्या या खेळात उत्तम व्यायाम तसेच चांगलं मनोरंजनही होते. एका संघातील खेळांडूनी दुसऱ्या संघातील खेळाडूंना ठराविक जागेमध्ये अडविणे व अडविलेल्या खेळाडूंनी हुलकावणी देऊन निसटून जाणे, अशी स्थूल रूपरेषा असलेला हा महाराष्ट्रीय खेळ आहे. या मैदानी खेळात कोंडी, हुलकावणी, शिवाशिवी अशा प्रकारांचा समावेश होतो.

खेळाचे नियम

चार किंवा त्याहून अधिक सम संख्येत असलेले कितीही लोक हा खेळ खेळू शकतात. या खेळाला विशेष असे काही नियम सुरुवातीला नव्हते. परंतू, 1914 मध्ये डेक्कन जिमखाना पुणे यांनी या खेळाचे अधिकृत असे काही नियम केल्याचे आढळते. त्या आधी केवळ खेळाडूंच्या प्रमाणात कोंडी (चौकटी) आखून त्यात विरुद्ध संघाच्या खेळाडूसाठी एक मर्यादीत रेशांतील जागा ठरवून देणे आणि डाव सुरु करणे अशी या खेळाची पद्धत.

खेळाडूंची संख्या

हा खेळ खेळण्यासाठी दोन संघ असतात. प्रत्येक संघात साधारण 9 खेळाडू असतात.प्रत्येक पाटीसाठी (सूरपाटी आणि चांभारपाटी) एक आणि प्रत्येक पाटीत (कोंड्यात) एक खेळाडू असतो. असे आठ खेळाडू असतात उर्वरीत पंच असतात. दोन्ही संघाचे गुण लिहिण्यासाठी गुणलेखकही नेमला जातो.

No comments:

Post a Comment

शेतकऱ्यांचा खास मित्र: खोकड

खोकड हा एक लहान आकाराचा सस्तन प्राणी आहे.हा मांसाहारी गणाच्या कॅनिडी कुलातील आहे. या कुलात कुत्रा, लांडगा, कोल्हा, वन्य कुत्रा, इ. प्राणी ये...