( विशेष: वर्ल्ड वाईड वेब डे, १ ऑगस्ट)
1 ऑगस्ट रोजी 'डल्ल्यूडल्ल्यूडब्ल्यू' (WWW) म्हणजे वर्ल्ड वाइड वेब 34 वर्षांचे होईल.हा दिवस जगभर वर्ल्ड वाइड वेब डे म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने आम्ही तुम्हाला वर्ल्ड वाईड वेबचा इतिहास आणि त्याच्याशी संबंधित काही रंजक गोष्टी सांगत आहोत.
आजच्या डिजिटल काळात, जवळजवळ प्रत्येक व्यक्तीचा वर्ल्ड वाइड वेब या शब्दाशी कोणत्या ना कोणत्या प्रकारे संबंध आलेला आहे. १ ऑगस्ट हा दिवस जगभरात वर्ल्ड वाईड वेब डे म्हणून साजरा केला जातो. वर्ल्ड वाइड वेबची निर्मिती संगणक शास्त्रज्ञ टिम बर्नर्स-ली यांनी 1989 साली केली होती. तेव्हापासून वेबचे म्हणजे इंटरनेटचे संपूर्ण स्वरूपच बदलून गेले.
अशी झाली सुरुवात :
1989 मध्ये, 35 वर्षीय युरोपियन टिम बर्नर्स ली यांनी युरोपियन ऑर्गनायझेशन फॉर न्यूक्लियर रिसर्च (सीईआरएन- सर्न) मध्ये सहकारी संशोधक म्हणून काम करत होते. येथे ली एका संगणक प्रणालीची माहिती दुसऱ्या संगणकावर पाठवत असे. यावेळी त्यांनी विचार केला की, अशी पद्धत का तयार करू नये ज्याद्वारे सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होईल. त्याच्या याच विचाराने वर्ल्ड वाइड वेबला जन्म दिला. त्यानंतर लीने "इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट अ प्रपोजल" नावाचा शोधनिबंध तयार केला आणि ते वर्ल्ड वाइड वेबचे जनक बनले. टिम बर्नर्स लीच्या प्रतिभेचा अंदाज आपण यावरून लावू शकतो की वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी त्यांनी स्वतःसाठी एक छोटा संगणक संच बनवला होता.
अशी आली कल्पना:
CERN मध्ये काम करत असताना, लीने 1980 मध्ये एक प्रोग्राम तयार केला, जो संगणकात उपस्थित असलेल्या सर्व फाईल्सला लिंक करत असे. त्यांनी या प्रोग्रॅमला 'इनक्वायर' असे नाव दिले. हा प्रोग्राम यशस्वीरित्या काम केल्यानंतर, लीने विचार केला की ज्या पद्धतीने आपण संगणकाच्या सर्व फाईल्स जोडण्यासाठी एक प्रोग्राम तयार केला आहे, तशाच प्रमाणे त्यांना दुसरा प्रोग्राम तयार केला पाहिजे, असे वाटू लागले.परंतु यावेळी प्रोग्राम "इन्क्वायर" सारख्या केवळ एका संगणकापुरता मर्यादित नसेल तर जागतिक स्तरावरील सर्व संगणकांना एका माहिती प्रणालीमध्ये जोडेल.
काय आहे वर्ल्ड वाइड वेब?
वर्ल्ड वाइड वेब, ज्याला आपण 'डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू' (WWW) किंवा "वेब" म्हणून देखील ओळखतो, हा फक्त वेबसाइट्सचा संग्रह आहे, जे इंटरनेटद्वारे स्थानिक संगणकांशी जोडले जातात. वर्ल्ड वाइड वेब हे एकमेव माध्यम आहे ज्याद्वारे आपण आपल्या डेस्कटॉप, लॅपटॉप किंवा मोबाईल फोनच्या स्क्रीनवर फक्त एका क्लिकवर इंटरनेटद्वारे संपूर्ण जगाची सर्व प्रकारची माहिती मिळवतो. जेव्हा आपण इंटरनेटवर कोणतीही युआरएल (URL) म्हणजे "युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर" टाइप करतो तेव्हा हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल (एचटीटीपी -HTTP) नंतर डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू (www) लिहितो.हेच ते डब्ल्यूडब्ल्यू डब्ल्यू वर्ल्ड वाइड वेब आहे, जे 1989 मध्ये अस्तित्वात आले. आज जेव्हा जेव्हा आपल्याला कोणत्याही विषयाशी संबंधित प्रश्न पडतो किंवा आम्हाला एकाद्या विषयावरची माहिती हवी असते तेव्हा आपण बहुतांशी गुगल सर्च इंजिनची मदत घेतो.गुगल सर्च बॉक्समध्ये तुमच्या कुतूहलाशी निगडित काही शब्द टाईप केल्यावर काही सेकंदही लागत नाहीत आणि लगेच संबंधित माहिती असलेली लाखो वेब पेजेस आपल्या समोर येतात. हे सर्व वर्ल्ड वाइड वेबमुळे शक्य झाले आहे.
इंटरनेट आणि वर्ल्ड वाइड वेब मधील फरक:
पूर्वी लोक इंटरनेट आणि वर्ल्ड वाईड वेबला समान समजत असत, परंतु आज आपल्याला माहित आहे की तसे काही नाही.वास्तविक, वर्ल्ड वाइड वेब हा ऑनलाइन पृष्ठांचा एक समूह आहे, तर इंटरनेट हे एक मोठे नेटवर्क आहे ज्याद्वारे जगभरातील संगणक आणि उपकरणे जोडली जातात. असे म्हणायचे आहे की इंटरनेट हे एक मोठे प्लॅटफॉर्म आहे आणि वर्ल्ड वाइड वेब या प्लॅटफॉर्मवर डेटा प्रदान करते.
या संबंधित आणखी काही मनोरंजक माहिती
» वर्ल्ड वाइड वेबचा शोध पहिल्या प्रथम फक्त शास्त्रज्ञांसाठी लावला गेला होता.
» डिसेंबर १९९० पर्यंत वेब पूर्णपणे कार्यान्वित झाले होते.
» वर्ल्ड वाइड वेबच्या आधी इंटरनेट आले होते.
» पहिली वेबसाइट 6 ऑगस्ट 1991 रोजी लाइव्ह झाली होती.
» पहिली वेबसाइट स्वित्झर्लंडमधील युरोपियन ऑर्गनायझेशन फॉर न्यूक्लियर रिसर्च (सीईआरएन) येथे कार्यान्वित झाली. हे संशोधन केंद्र आहे जिथे सर टिम बर्नर्स-ली काम करत होते.
» 30 एप्रिल 1993 रोजी, CERN ने सार्वजनिक वापरासाठी इंटरनेट खुले केले, ज्यामुळे लोकांना आणि कंपन्यांना त्यांची स्वतःची वेब पृष्ठे तयार करण्याची परवानगी मिळाली.
»पहिल्या वेबसाइट्समध्ये फक्त शब्दं आणि चित्रे होती, कोणतेही व्हिडिओ किंवा सोशल मीडिया फीड नव्हते.
» इंटरनेटवर पहिली ऑर्डर 1994 मध्ये पिझ्झा हटला देण्यात आली होती.
अॅमेझॉन मूळत: 1995 मध्ये पुस्तकांचे दुकान म्हणून ऑनलाइन सुरू झाले होते.
-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:
Post a Comment