Friday, September 15, 2023
ग्रेट वॉल ऑफ चायना
जगातील सर्वात मोठी भिंत ज्याला 'ग्रेट वॉल ऑफ चायना' असेही म्हणतात. ही भिंत 1987 मध्ये युनेस्कोने वारसा स्थळांमध्ये समाविष्ट केली होती. ही प्रचंड भिंत माती आणि दगडांनी बनलेली असल्याचे सांगितले जाते. जी 5 व्या शतक ते 16 व्या शतकापर्यंत चीनच्या विविध शासकांनी बांधली होती. ही भिंत बांधण्यामागचा उद्देश हल्लेखोरांपासून स्वतःचे संरक्षण करणे हा होता. अंतराळातून पृथ्वीवरील दिसणारी ही भिंत एकमेव अशी आहे. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार, ही भिंत तिच्या सर्व शाखांसह 21,196.18 किलोमीटर लांब आहे.आठव्या शतकात, कुई यान आणि झाओ राज्यांनी धनुष्यबाण आणि तलवारींच्या हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी माती आणि दगड साच्यात बसवून तशा प्रकारच्या विटांच्या भिंती बांधल्या. चीन ख्रिस्तपूर्व २२१ वर्षांपूर्वी 'किन' साम्राज्याखाली आला होता. या साम्राज्याने सर्व छोटी राज्ये एकत्र करून अखंड चीन निर्माण केला. यानंतर, 'किन' साम्राज्याच्या शासकांनी सर्व भिंती एकत्र केल्या, जी चीनची उत्तर सीमा बनली. 5 व्या शतकापासून, अनेक भिंती बांधल्या गेल्या, ज्यांना एकत्रितपणे चीनची ग्रेट वॉल म्हटले गेले. ही भिंत बांधण्यासाठी 20 ते 30 लाख लोकांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातल्याचे सांगितले जाते. ही भिंत 1970 मध्ये सर्वसामान्य पर्यटकांसाठी खुली करण्यात आली.
Subscribe to:
Post Comments (Atom)
शेतकऱ्यांचा खास मित्र: खोकड
खोकड हा एक लहान आकाराचा सस्तन प्राणी आहे.हा मांसाहारी गणाच्या कॅनिडी कुलातील आहे. या कुलात कुत्रा, लांडगा, कोल्हा, वन्य कुत्रा, इ. प्राणी ये...
-
तंत्रज्ञानाच्या या विश्वात 20 वर्षे घालवल्यानंतर, डॉ तथागतो राय यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेने सुसज्ज असे उपकरण तयार केले आहे जे एका मिनिटात म...
-
रोबोट आता बरीच कामे करीत आहे. घर, ऑफिस ची साफसफाई करतो, जेवण सर्व्ह करतो. गाणी म्हणतो, रुग्णांची सेवा करतो. इतकेच नव्हे तर रोबोट रुग्णांवर श...
-
आपल्या देशात नद्यांना मातेचा दर्जा देऊन त्यांची पूजा केली जाते.जसे की गंगा नदीला सर्वात पवित्र नदी म्हटले जाते आणि या नदीची माता म्हणून पूजा...

No comments:
Post a Comment