Wednesday, September 6, 2023

सांस्कृतिक शहर श्रीरंगपट्टणम्


कर्नाटकातील सुंदर शहर असलेले श्रीरंगपट्टणम् प्राचीनता आणि आधुनिकतेच्या अद्भुत मिश्रणाचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे.येथील किल्ले-महाल, धार्मिक स्थळे आणि नैसर्गिक सौंदर्य पर्यटकांना खूप आकर्षित करतात. म्हैसूरपासून सुमारे पंधरा किलोमीटर अंतरावर श्रीरंगपटनम वसलेले आहे.  इतिहासातील अनेक घटनांची नोंद या शहराच्या पुरातन काळात सामावलेली आहे. म्हैसूरचा तत्कालीन राजा टिपू सुलतान याचे साम्राज्य येथे विस्तारले होते. होसालसा राजापासून ते ब्रिटिश राजवटीच्या काळापर्यंतच्या इमारती येथे उभ्या आहेत. सर्व धर्मांची स्मारके इथल्या लोकांच्या धर्मनिरपेक्षतेची, प्रेमाची आणि शांततेची भावना दर्शवतात. भव्य ठिकाणे पाहण्यासाठी देश-विदेशातील हजारो पर्यटक येथे येतात. येथील पवित्र स्थळांचे दर्शन घेतल्याने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात, असा भाविकांचा विश्वास आहे. स्थानिक रहिवाशांच्या लोककथा ऐकून पर्यटक मंत्रमुग्ध होतात. श्रीरंगपट्टणममध्ये प्रवेश करताच येथील मुख्य आकर्षण पाहायला मिळते ते म्हणजे दुहेरी तटबंदीचा किल्ला.हा भारतातील सर्वात मजबूत किल्ला मानला जातो.  या किल्ल्यात बाहेरून आत जाण्यासाठी बांधलेला पूल आजही वापरात आहे. टिपू सुलतानचा निवास लाल महाल किल्ल्यात होता. पण आज या महालाचे काही भागच शिल्लक आहेत.  किल्ल्याला बंगळुरू, म्हैसूर, दिल्ली आणि जलमार्ग एलिफंटगेट असे चार प्रवेशद्वार आहेत. या किल्ल्याच्या कारागृहात कैद्यांना ठेवले जात असे.  श्रीरंगपट्टणम् संध्याकाळी खूप सुंदर दिसते.मावळत्या सूर्याच्या लालीमध्ये नदीचे सौंदर्य झगमगून निघते. जणू कोणीतरी लाल कुंकू शिंपडले आहे. सूर्याची लाली दूर दूरवर पसरलेली दिसते. श्रीरंगपट्टणममधील रंगनाथ स्वामींचे मंदिर खूप प्रसिद्ध आहे.हे मंदिर वैष्णव पंथाचे केंद्र मानले जाते.  त्याचे वैशिष्ट्य म्हणजे हे कावेरी नदीच्या तीन बेटांवर वसलेले आहे. श्रीरंगपट्टणम् येथे आदि रंगाचे मंदिर आहे.  येथे वर्षभर पर्यटक येत असतात.- मच्छि ऐनापुरे, जत जि. सांगली 

No comments:

Post a Comment

शेतकऱ्यांचा खास मित्र: खोकड

खोकड हा एक लहान आकाराचा सस्तन प्राणी आहे.हा मांसाहारी गणाच्या कॅनिडी कुलातील आहे. या कुलात कुत्रा, लांडगा, कोल्हा, वन्य कुत्रा, इ. प्राणी ये...