बाहेरील प्रदूषित पाणी टाळण्यासाठी, आपण आपल्या स्वतःच्या घरून पाण्याच्या बाटल्या घेऊन जाऊ शकतो, परंतु प्रदूषित हवा टाळण्यासाठी आपल्याकडे खूप कमी मार्ग आहेत.आज देशातील आणि जगातील बहुतेक लोकांना प्रदूषित हवेमुळे अनेक प्रकारच्या आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे आणि त्याबद्दल ते चिंतेतही आहेत.पण काही लोकच त्यावर उपाय शोधण्यासाठी त्यावर काम करत आहेत. दिल्लीचे रवी कौशिक हा त्या निवडक लोकांपैकी एक आहे.रवीने लहानपणापासूनच दिल्ली आणि आसपासचे वाढते वायू प्रदूषण पाहत आला आहे. समस्या मोठी असली तरी ती सोडवण्यावर मात्र फार कमी काम झाले आहे.
वास्तविक, ही समस्या केवळ दिल्लीची नाही तर संपूर्ण देशाची आहे.याच विचाराने प्रेरित होऊन त्याने आयआयटी मुंबईत एरोसोल सायन्स विषय घेऊन प्रवेश घेतला. इथे शिकत असताना त्यांना कळलं की घराबाहेरची हवाच नाही तर घरातील हवादेखील तितकीच प्रदूषित आहे.जरी बाजारात अनेक प्रकारचे एअर प्युरिफायर उपलब्ध असले तरी एकतर ते महाग असल्यामुळे ते सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे किंवा बहुतेक लोक ते वापरायला विसरतात.अशा परिस्थितीत त्याला आपल्या रोजच्या जीवनाचा एक भाग म्हणून काम करेल असे काहीतरी निर्माण करायचे होते.
याच विचाराने प्रेरित होऊन त्याने 2020 मध्ये शिक्षण पूर्ण झाल्यावर एरोसोल सायन्स आणि मायक्रोबायोलॉजी या दोन्ही विषयांवर काम करण्यास सुरुवात केली. सुमारे एक वर्षानंतर, आयआयटी कानपूरच्या मदतीने त्याने एक लहान आणि किफायतशीर उपकरण विकसित केले जे एसीमधून बाहेर पडणारी हवा पूर्णपणे स्वच्छ करते. त्याने बनवलेले फिल्टर वापरण्यासही खूप सोपे आहे आणि तुमच्या एसीमधून बाहेर पडणारी हवा कोणतीही वीज न वापरता शुद्ध करण्याचे काम करते. आयआयटी कानपूरमध्ये केलेल्या संशोधनात त्याने पाहिले की, हे प्युरिफायर अवघ्या एका तासात हवेतील प्रदूषण दूर करू शकते.
2023 मध्ये, रवीने त्याच्या स्टार्टअप एअरथ अंतर्गत हे उत्पादन देशभरात विकण्यास सुरुवात केली. त्याच्या वेबसाइट आणि ऑनलाइन शॉपिंग साइटच्या मदतीने, त्याने आतापर्यंत 100 हून अधिक प्युरिफायर विकले आहेत. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, महागड्या मशीनच्या तुलनेत हे प्युरिफायर फक्त 2000 रुपयांमध्ये मिळते. रवी आपल्या आविष्कारातून प्रत्येक घराची हवा शुद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे. जर तुम्हाला त्याच्या महान शोधाबद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही त्याच्याशी https://airth.in/ वर संपर्क साधू शकता. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:
Post a Comment