Thursday, March 23, 2023

जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा ...................... जिल्हाधिकाऱ्यांना मदत करतात.


प्रश्न 1. रिकाम्या जागा भरा.

1. प्रत्येक गावाचा स्थानिक कारभार .......... करते.

2.प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किमान ........ सभा होणे बंधनकारक आहे.

3. महाराष्ट्रात सध्या .............. जिल्हे आहेत. 

4. महाराष्ट्रात प्रथम महानगरपालिका स्थापन करण्यात आले, त्या शहराचे नाव ...........

5. शहर होण्याच्या प्रक्रियेत जी गावे असतात तेथे कामकाज पाहते .............

6. नगरपरिषदेच्या आर्थिक प्रशासनावर लक्ष ठेवतो .........

7. जिल्हा प्रशासनाचा प्रमुख ............ असतो. 

8. ............... तालुका दंडाधिकारी या नात्याने तंट्यामध्ये निवाडाही करतो.

9. जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा ...................... जिल्हाधिकाऱ्यांना मदत करतात. 

10. भारताच्या संविधानाने स्वतंत्र................ निर्मिती केली आहे.

11. जिल्हा पातळीवर असणाऱ्या न्यायालयाला ........... असे म्हणतात. 

12. आपत्तींच्या सुव्यवस्थित व शास्त्रीय पद्धतीने सामना करण्याच्या प्रक्रियेला ............................... असे म्हणतात.

उत्तर. 1. ग्रामपंचायत 2.सहा 3. 36 4. मुंबई 5. नगरपंचायत 6. नगराध्यक्ष 7.जिल्हाधिकारी 8. तहसीलदार 9. पोलीस प्रमुख 10. न्यायालय 11. जिल्हा न्यायालय 12. आपत्ती व्यवस्थापन 

No comments:

Post a Comment

शेतकऱ्यांचा खास मित्र: खोकड

खोकड हा एक लहान आकाराचा सस्तन प्राणी आहे.हा मांसाहारी गणाच्या कॅनिडी कुलातील आहे. या कुलात कुत्रा, लांडगा, कोल्हा, वन्य कुत्रा, इ. प्राणी ये...