देशात २०२१-२२ या वर्षात ७५ हजार ३९४ कुष्ठरुग्ण आढळले असून त्यात सर्वाधिक महाराष्ट्रातील १७ हजार १४ रुग्ण आहे. त्या खालोखाल बिहार, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, मध्य प्रदेश या राज्यांचा क्रमांक आहे. देशात २०१४-१५ मध्ये कुष्ठरोगींची संख्या एक लाख १५ हजार ७८५ होती. कुष्ठरोग निर्मूलनासाठी राबविलेल्या उपाययोजना, उपचार पद्धतीमुळे कुष्ठरुग्णांची संख्या घटली. देशात २०१९-२० या वर्षी एक लाख १४ हजार ४५१ कुष्ठरुग्ण होते. यात पुढील वर्षी म्हणजे २०२०-२१ मध्ये जवळपास ४३ टक्क्यांची घट होऊन रुग्णांची संख्या ६५ हजार १४७ आली. मात्र २०२१-२२ या वर्षात १५.७ टक्क्यांची वाढ होऊन रुग्णांची संख्या ७५ हजार ३१४ झाली आहे. कुष्ठरोग निर्मूलनासाठी राष्ट्रीय आरोग्य मिशन (एनएचएम) अंतर्गत राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम (एनएलईपी) मध्ये दरवर्षी केंद्राकडून राज्यांना निधी दिली जातो. यात महाराष्ट्राला २०१९-२० या वर्षी ४.८३ कोटी, २०२०-२१ या वर्षी ३.७६ कोटी तर २०२०-२१ या वर्षी २.१२ कोटी रुपये देण्यात आले.
कुष्ठरुग्णाचे तीन प्रकार वर्गीकरण केले गेले आहे. यात ‘ट्युबरक्युलॉइड कुष्ठरोग’, ‘लेप्रोमेटास कुष्ठरोग’ आणि ‘बॉर्डर लाइन’ असे तीन प्रकार विभागले गेले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने कुष्ठरोगाचे ‘पॉकीबॅकिलरी’ आणि ‘मल्टिबॅकिलरी’ असे वर्गीकरण केले आहे. ‘पॉकीबॅकिलरी’ प्रकारात त्वचेवर पाचपेक्षा कमी चट्टे असतात तर ‘मल्टीबॅकिलरी’ प्रकारात पाचपेक्षा जास्त कुष्ठरोगाचे चट्टे असतात.
देशातील कुष्ठरोग असलेल्यांची संख्या (जानेवारी २०२३ पर्यंतची आकडेवारी)महाराष्ट्र १७,०१४बिहार ११,३१८उत्तर प्रदेश १०,३१२छत्तीसगड ७,४२२मध्य प्रदेश ७,३१३झारखंड ६,१८४ओडीसा ६,०८८पश्चिम बंगाल ५,०१२आंध्र प्रदेश २,७६९गुजरात २,६६२कर्नाटक २,०९१तमिळनाडू २,५९१तेलंगणा २,५६४दिल्ली १,१८८राजस्थान ९६९आसाम ७१९ हरियाणा ३६६हिमाचल प्रदेश १३२पंजाब ३६५केरळ ३८४उत्तराखंड २९४
No comments:
Post a Comment